Type Here to Get Search Results !

अवैद्य दारू विक्रीवर छापा ... हजारो रुपयांचा मुद्देमाल जप्त

अवैद्य दारू विक्रीवर छापा ... हजारो रुपयांचा मुद्देमाल जप्त


सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन अंकित करंजेपुल पोलीस दुरक्षेत्र चे पोलीस हवालदार के.ए. कडवळे यांना मिळालेल्या गोपनीय बातमी नुसार वाघळवाडी गावचे हददीत कन्नडवस्ती येथे राहते घराचे आडोशाला रणजित विरसिंग रावळकर रा. वाघळवाडी, कन्नडवस्ती हा गावठी हातभटटी तयार दारूची विक्री करीत आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे साो, यांनी सदर ठिकाणी छापा कारवाई करीता दोन पंचाना बोलावुन घेतले त्यांना व आंम्हा पोलीस अंमलदारांना बातमीचा आशय कळविला. पंच, सदर छापा कारवाई करणेकामी येण्यास तयार झाल्यामुळे वरील पोलीस स्टाप व पंच असे खाजगी वाहनाने करंजेपुल पोलीस दुरक्षेत्र येथुन निघुन बातमीचे ठिकाणी जावुन गाडी थोडे अलीकडे वाहन थांबवून थोडे अंतर पायी चालत जाऊन खात्री केली केली असता सदर ठिकाणी एक इसम आपले पुढयात एक ३५ लिटर मापाचे प्लॅस्किचे कॅन्ड घेऊन असलेला दिसला त्यास आंम्ही जागीच पकडुन त्याचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव रणजित विरसिंग रावळकर वय ५३ वर्षे रा. वाघळवाडी, कन्नडवस्ती असे सांगितले त्यावेळी आंम्ही त्याचे घराचे समोर पाहणी केली असता खालील प्रमाणे प्रोव्हीवेशन गुन्हयाचा मुददेमाल मिळुन आला.
१) ३५,०००/- रूपये किमतीचे एकुन १० प्लॅस्टिकची कॅन्ड, प्रत्येकी ३५ लिटर मापाचे प्रत्येक
कॅन्डमध्ये ३५ लिटर गावठी हातभटटीची तयार दारू. कि.अं.
२) १०००/- रूपये किमतीचे एकुन २ प्लॅस्टिकची पांढरे रंगाचे कॅन्ड, प्रत्येकी कॅन्ड ५ लिटर मापाचे त्यामध्ये एकुन १० लिटर गावठी हातभटटीची तयार दारू. कि.अं.
३६,०००/- असा वरील वर्णनाचा व किमतीचा गावठी हातभटटीचा दारूचा माल मिळुन आला तो पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे सो यांनी जागीच पंचासमक्ष जप्त करून जप्त मालातुन एका काचेच्या बाटलीत १८० मिली गा.हा.भ ची तयार दारूची रॉम्पल बाटली मा केमीकल अॅना पुणे येथे तपासणी साठी पाठविण्यासाठी बाजुला काढुन घेवुन शॅम्पल बाटलीस पंचांचे व पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे सो यांचे सहयांची सिले लेबले जागीच करण्यात आली. छापा घातला ती वेळ १३:२५ वा सुमाराची होती.रविवार दि.२७/०४/२०२५ रोजी वाघळवाडी गावचे हददीत कन्नडवस्ती येथे राहते घराचे आडोशाला रणजित विरसिंग रावळकर वय ५३ वर्षे रा. वाघळवाडी, कन्नडवस्ती हा आपले कब्जात बेकायदा एकुन १० प्लॅस्टिकचे कॅन्ड, प्रत्येकी ३५ लिटर मापाचे कॅन्ड त्यामध्ये गावठी हातभटटीची तयार दारू तसेच २ प्लॅस्टिकचे ५ लिटर मापाचे पांढरे रंगाचे त्यामध्ये गावठी हातभटटीची तयार दारू १० लिटर अशी एकुन ३६० लिटर गावठी हातभटटीची तयार दारू असा ३६,०००/- किमतीचा मुददेमाल जवळ बाळगले असताना मिळुन आला आहे, म्हणुन माझी रणजित विरसिंग रावळकर वय ५३ वर्षे रा. वाघळवाडी, कन्नडवस्ती याचे विरूध्द मुंबई. दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) प्रमाणे कायदेशीर फिर्याद आहे
ही कारवाई  पोलीस अधीक्षक बारामती,‌पोलीस उप अधीक्षक बारामती विभाग, प्रभारी अधिकारी वडगाव निंबाळकर स पो सचिन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली करंजेपूल दुरक्षेत्र पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे ,पोलिस हवालदार आर. एल. नागटिळक, दीपक वारुळ,ए.एम. भोसले, एस.पी. देशमाने, के.ए. कडवळे यांनी केली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test