खुनाचे गुन्हयातील आरोपींना ४८ तासात अटक.
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील सोरटेवाडी गावचे हद्दीतील कुलकर्णी चारी ते शेंडकरवाडी रोडवरील एका पोल्ट्री जवळ रोडचे कडेला असणारे पुलावर दि.५ रोजी य अमोल वसंत माने व त्याचा भाऊ सागर वसंत माने रा. सोरटेवाडी यांनी यातील मयत रोहीत सुरेश गाडेकर यांचेकडुन व्याजाने घेतलेले १५ लाख रूपये परत देतो असे म्हणुन सदर ठिकाणी बोलावुन घेवुन यातील आरोपी अमोल वसंत माने व त्याचा भाऊ सागर वसंत माने यांनी मिळुन धारदार शस्त्र कु-हाड व कोयत्याने रोहीत गाडेकर याचे तोंडावर, गळयावर, मानेवर, डोक्यात, हातावर वार करून त्यास जिवे ठार मारून तेथुन फरार झाले.
त्याबाबत तक्रारदार अविनाश सुरेश गाडेकर याने वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.१०४/२०२५ भारतीय न्याय संहीता कायदा कलम १०३(१),३ (५). प्रमाणे दि. ०६/०४/२०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा तपास गणेश बिरादार सो. अपर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग, मा.डी. वाय.एस. सुदर्शन राठोड सो बारामती, मा. प्रभारी अधिकारी सचिन काळे वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हे करत आहेत. सदर गुन्हयाचे तपासात तिसरा आरोपी विक्रम काकासो मासाळ रा. मासाळवाडी हा देखील सदर गुन्हा करतेवेळी सामील असल्याचे निष्पन्न झालेने सदर गुन्हयातील तिन्ही फरार आरोपीतांचा गोपनीय माहिती व तांत्रिक माहितीचे आधारे शोध घेवुन यातील आरोपी सागर वसंत माने व विक्रम काकासाो मासाळ यांना पुणे येथील चाकण येथुन ताब्यात घेण्यात आले व यातील मुख्य आरोपी अमोल वसंत माने यास निडगुंडी कर्नाटक येथुन गोपनीय माहितीचे आधारावर शिताफीने ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांचेकडे सदर गुन्हयाचे अनुषंगाने अधिक चौकशी केली असता यातील आरोपी यांनी रोहीत गाडेकर हा व्याजाने दिलेले पैशासाठी सारखाच तगादा लावुन त्रास देवुन जास्त व्याज घेवुन त्रास देत होता. त्यामुळे आमचा सुरवातीला किरकोळ वाद झाला म्हणुन आम्ही त्याचे व्याजाचे त्रासाला वैतागुन तिघांनी मिळून एकत्र येवुन त्याला सदर ठिकाणी बोलावुन घेवुन त्याचा खुन केल्याची कबुली दिलेली आहे.
सदरची कामगिरी ही मा.श्री. पंकज देशमुख सो, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, मा.श्री. गणेश बिरादार सो. अपर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग, मा.श्री. सुदर्शन राठोड सो. उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती उपविभाग, मा.श्री. अविनाश शिळीमकर पोलीस निरीक्षक, स्था.गु. शा, यांचे मार्गदर्शनाखाली वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन चे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक सचिन काळे, पोसई राहुल साबळे, पो.हवा अनिल खेडकर, पोपट नाळे, हृदयनाथ देवकर, महेश पन्हाळे, सुर्यकांत कुलकर्णी, भाउसो मारकड, रमेश नागटीळक, अमोल भोसले, सागर देशमाने, सहाफौज बाळासाहेब कारंडे स्था.गु.शा. सुनिल बालगुडे, दिपक वारूळे, सागर चौधरी, कुंडलीक कडवळे, आवा जाधव, सुरज धोत्रे, विलास ओमासे, निलेश जाधव, नागनाथ परगे, भानुदास सरक, धनजय भोसले, पो हवा. राजु मोमीन स्था.गु.शा. यांनी केलेली आहे सदर गुन्हयांचा पुढील तपास चालु आहे.