प्रशिक्षण पूर्णतः निशुल्क असून उपस्थित राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या अल्पोहार तसेच जेवणाची सुविधा
बारामती : कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) आणि कृषी विज्ञान केंद्र बारामती यांचे संयुक्त विद्यमाने तालुक्यातील तेलबिया (सूर्यफूल व करडई) उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक दिवशीय जिल्हाअंतर्गत प्रशिक्षण शुक्रवार, 25 एप्रिल 2025 रोजी कृषी विज्ञान केंद्र बारामती येथे आयोजित करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण पूर्णतः निशुल्क असून उपस्थित राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या अल्पोहार तसेच जेवणाची सुविधा करण्यात आली आहे,अशी माहिती तालुका कृषी अधिकारी सुप्रिया बांदल यांनी दिल आहे.