लोणीभापकर येथील भूमिपुत्र ग्रामीण बिगर शेती सह. पतसंस्थेचा प्रथम वर्धापन उत्साहात संपन्न
बारामती - बारामती तालुक्यातील लोणीभापकर येथील भूमिपुत्र ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित लोणी भापकर या पतसंस्थेचा प्रथम वर्धापन दिन... दि ९ रोजी उत्साहात संपन्न झाला याप्रसंगी संस्थेचे सर्व संचालक कामगार वर्ग चेअरमन व्हाईस चेअरमन संस्था सभासद ठेवीदार हितचिंतक हे मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी संस्थेने चालू आर्थिक वर्षात केलेल्या सर्व व्यवहाराबद्दल माहिती संस्थेचे चेअरमन योगेश त्रिंबक भापकर यांनी सर्व सभासदांना दिली संस्थेने अल्पावधीतच एक कोटी ठेवींचे उद्दिष्ट पार केलेले आहे तसेच संस्थेच्या थकबाकीचे प्रमाण हे दोन टक्के च्या आत ठेवण्यात संस्था याला यश आले. या पुढील काळात संस्थेमध्ये चालू करणाऱ्या सर्व योजनांची माहिती सभासदांना देण्यात आली या प्रसंगी गावातील उपस्थितानी संस्था अल्पावधीतच सर्व सभासद ठेवीदार यांच्या विश्वास स पात्र ठरल्यामुळे संस्थेचे व सर्व संचालक मंडळ कामगार चेअरमन व्हाईस चेअरमन याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या याप्रसंगी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले याप्रसंगी पीडीसी बँक शाखा लोणी भापकर मधील सर्व कर्मचाऱ्यांचा त्यांच्या सहकार्याबद्दल सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे व्हाईस चेअरम जयदीप सुभाष भापकर यांनी केले . आभार प्रदर्शनाचे काम संस्थेचे सचिव विजय रघुनाथ पाटोळे यांनी केले अशी माहिती संस्थेचे चेअरमन योगेश त्रिंबक भापकर यांनी बोलताना दिली व खऱ्या गरजवंताला याचा लाभ व्हावा असे संस्थेचे ध्येय आहे असे सांगितले.