सोमेश्वरनगर - सायन्स कॉलेज सोमेश्वरनगर वाघळवाडी (ता. बारामती) येथे नमुद केले तारखेस वेळी व ठिकाणी यातील आरोपी मजकुर याने फिर्यादी कॉलेजमध्ये गेले होते. पोलीस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार दुपारच्या सुमारास ...ती मुलगी कॉलेजमधील आय. सी.टी. रुममध्ये एकटीच अभ्यास करीत असताना आदित्य साळुंखे हा फिर्यादी याचे जवळ येवुन फिर्यादीकडे वाईट भावनेने पाहुन फिर्यादीस म्हणाला की, " तु मला खुप आवडतेस, "माझे तुझेवर खुप प्रेम आहे. तु मला होकार दे असे म्हणुन फिर्यादीस त्रास दिला तसेच तु नाही म्हणालीस तर मी फाशी घेईल असे म्हणुन फिर्यादीस ब्लॅकमेल केले तेव्हा त्यास तु मला त्रास देवु नको माझे मागे मागे येवु नको तु माझेपेक्षा लहान आहेस असे माझे मनात तुझेविषयी काहीएक भावना नाहीत तु मला लहान भावा सारखा आहे असे म्हणाले तसेच फिर्यादीस त्याचेत काहीएक रुची नसताना फिर्यादी यानी त्यास स्पष्ट नकार दिला असताना तो फिर्यादीचे काहीएक ऐकुण न घेता तो त्याची वैयक्तीक रुची वाढविणेकरीता तो फिर्यादीशी जवळीकता करण्याचा प्रयत्न करुन फिर्यादीशी बोलण्याचा वेळोवेळी प्रयत्न करीत होता त्यानंतर फिर्यादी त्याचे भावाला बोलावुन घेते असे म्हणुन त्यास फोन मागीतला असता त्याने फोन दिला नाही फिर्यादी हे लगेच संक घेवुन रुमचे बाहेर जावु लागले असता त्याने फिर्यादी समोर आडवा उभा राहुन फिर्यादीस अडविले, त्यानंतर फिर्यादी हे कशीतरी तेथुन निघुन जिना चढुन वरती गेले त्यानंतर फिर्यादी हे पुन्हा जिना उतरुन घरी जाणेकरीता निघाले असताना पुन्हा आरोपी याने फिर्यादीस जिन्यात आडवे उभे राहुन थाबविले तेव्हा फिर्यादी हे त्यास मी तुझे माझे घरच्यांना नाव सांगते असे म्हणालेवर त्याने तु माझे नाव सागीतलेस मी फाशी घेईल अशी धमकी दिलेवर फिर्यादी हे एका बाजुने तेथुन ऩिघुन घरी येवुन घरच्यांना सदर घडलेला प्रकार सांगुन त्यांचेसह तकार देणेस आले आहे. वगैरे मजकुराची फिर्याद आलेने सदरचा गुन्हा रजिस्टरी दाखल केला असुन गुन्हयाचा वर्दी रिपोर्ट मा.प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सो कोर्ट बारामती यांचे कोर्टात रवाना करण्याची तजवीज ठेवलेली आहे.पुढील तपास वडगाव निंबाळकर चे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली करंजेपूल दूरक्षेत्र पी एस आय राहुल साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो हवा अमोल भोसले , अंमलदार पो हवा कडवळे करत आहे.
"मला खुप आवडतेस, "माझे तुझेवर खुप प्रेम आहे. तु मला होकार दे.. तु नाही म्हणालीस तर मी फाशी घेईल असे म्हणत ब्लॅकमेल केल्या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल.
April 26, 2025
0
"मला खुप आवडतेस, "माझे तुझेवर खुप प्रेम आहे. तु मला होकार दे.. तु नाही म्हणालीस तर मी फाशी घेईल असे म्हणत ब्लॅकमेल केल्या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल.
Tags