जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटनास गेलेल्या पर्यटकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ लोणंद मुस्लिम समाज बांधवांनी जुमा नमाज पठणानंतर एकत्र येऊन लोणंद येथील जामा मस्जिद मर्कस समोर हातात तिरंगा ध्वज घेऊन जम्मू काश्मीर च्या पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त केला व भ्याड हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या सर्व पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी लोणंद मुस्लिम जमाआत पदाधिकारी व समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.