सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील करंजे येथील प्रसिध्द श्री क्षेत्र स्वयंभू सोमेश्वर शिवलिंग मंदिर आहे. सौराष्ट्रातील सोरटी सोमनाथचे प्रतिरूप मानले जाते अशी आख्यायिका आहे. स्वयंभू सोमेश्वर शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी विविध जिल्ह्यातून भाविक भक्त येत असतात.भाविक हे मुंबई तसेच विविध जिल्ह्यातून म्हणजे लांबच्या पल्ल्यातून येत असतात त्या भाविक भक्तांना दर्शनाचा लाभ मिळावा . या दृष्टीने शनिवार दि १२ पासून मोठा निर्णय श्री सोमेश्वर मंदिराचा गाभारा दुपारी ३ वाजल्यापासून ते सायंकाळी ९ वाजेपर्यंत दररोज सोमेश्वर शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी उघडा ठेवणयाचा ठराव ट्रस्ट ने केला आहे व दुपारी १२ च्या आरती नंतर मंदिरात अन्नदानाचा प्रसाद कायमस्वरूपी सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट मार्फत देण्याचे ठरविले आहे तरी शिवभक्तांनी वरील दोन्ही ठरावांचा लाभ घ्यावा असे नम्र आवाहन सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट आध्यक्ष अनंत मोकाशी व सचिव विपुल भांडवलकर यांनी केले आहे.
शिवभक्तांनसाठी करंजेतील ' सोमेश्वर ' शिवलिंग गाभारा दर सोमवार व अमावस्या दिवशी दिवसभर दर्शनासाठी खुले.
April 12, 2025
0
शिवभक्तांनसाठी करंजेतील ' सोमेश्वर ' शिवलिंग गाभारा दर सोमवार व अमावस्या दिवशी दिवसभर दर्शनासाठी खुले.
Tags