सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी मिलिंद बळवंत कांबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नुकतीच कांबळे यांना संचालक पद मिळाले होते.
या अगोदरचे उपाध्यक्ष बाळासाहेब कामथे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्तपदी ही निवड करण्यात आली. कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्या अध्यक्षतेखाली आज दि. ३ रोजी जिजाऊ सभागृहात झालेल्या संचालक मंडळाच्या मासिक सभेत हा निर्णय घेण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुचवलेल्या नावाची घोषणा करण्यात मासिक सभेत शिक्कामोर्तब करण्यात आले. यावेळी माजी अध्यक्ष ज्येष्ठ संचालक राजवर्धन शिंदे , सर्व संचालक मंडळ सह कार्यकारी संचालक राजेंद्र यादव, सचिव कालिदास निकम उपस्थित होते.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक प्रमोद दुर्गुडे यांनी काम पाहिले.