Type Here to Get Search Results !

Crime News सुपा पोलीस स्टेशनची शेती मालात बेकायदेशिर अफुच्या शेतीवर कारवाई.


Crime News सुपा पोलीस स्टेशनची शेती मालात बेकायदेशिर अफुच्या शेतीवर कारवाई.
सुपा - बारामती तालुक्यातील पानसरेवाडी गावाचे शिवारात शेती मालात बेकायदेशिर विनापरवाना लागवड करण्यात आलेल्या अफुच्या शेतीवर कारवाई करत एकुण ७६१०५ रूपये किंमतीची सुमारे ०८ किलो ४९७ ग्रॅम अफुच्या बोंडासह झाडे हस्तगत!  सुपा पोलीस स्टेशनची कारवाई
 मिळालेल्या माहितीनुसार अंमली पदार्थ वनस्पतींची बेकायदेशिर विनापरवाना लागवड करून उत्पादन घेवुन विकी केल्यामुळे कमी कालावधीत झटपट पैसा कमविता येतो अशी धारणा लोकांमध्ये तयार झाली आहे. यातुनच कायदयाचा भंग करून काही लोक शेतीचे नावाखाली शेती मालात अफु, गांज्या सारख्या अंमली पदार्थ निर्मिती करणा-या वनस्पतींची बेकायदेशिरपणे विनापरवाना लागवड करून उत्पादन घेत आहेत. याबाबत पुणे ग्रामीण जिल्हयाचे पोलीस अधिक्षक,मा  पंकज देशमुख यांनी अंमली पदार्थाचे उत्पादन, साठा, विकी व सेवन करणारे इसमांवर कडक कारवाई करण्याचे आदेश पुणे ग्रामीण पोलीसांना दिलेले होते.

सुपा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री. मनोजकुमार नवसरे यांना दि.०१ रोजी १८/०० वा.चे सुमारास गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, मौजे पानसरेवाडी ता. बारामती जि पुणे गावचे हददीत श्री. राजेंद्र ग्यानबा कुतवळ रा. पानसरेवाडी ता. बारामती जि पुणे यांनी त्यांचे मालकीचे शेतात बेकायदेशिरपणे विनापरवाना अफुंच्या झाडाची विक्री करण्याच्या उद्देशाने लागवड केलेली आहे. सदर बातमीचा आशय मा. सुदर्शन राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी साो, बारामती विभाग बारामती यांना सांगुन त्यांचेकडुन करवाईचे आदेश प्राप्त करून घेवुन सपोनि मनोजकुमार नवसरे सुपा पोलीस स्टेशनकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचेसह मौजे पानसरेवाडी गावात जावुन मिळालेल्या बातमीचे आधारे नमुद संशयित इसमांचे शेताची पाहणी केली असता, त्यांचे शेतामध्ये अफुची बेकायदेशिर विनापरवाना लागवड केल्याचे आढळुन आले. सदर ठिकाणी कारवाई दरम्यान एकुण ७६१०५/- रूपये किंमतीचा सुमारे ८ किलो ४९७ ग्रॅम वजनाची बोंडासह अफुची झाडे हस्तगत करणेत आलेली आहेत. 
सदर इसम नामे राजेंद्र ग्यानबा कुतवळ रा. पानसरेवाडी ता. बारामती जि पुणे यांना ताब्यात घेवुन त्यांच्यावर सुपा पोलीस स्टेशन येथे गु.रं.नं. ४१/२०२५ एन डी पी एस अॅक्ट ८ (ब),८ (क), १८ (ख) प्रमाणे गुन्हा नोंदविणेत आलेला आहे.

सदरची कामगिरी पंकज देशमुख साो, पोलीस अधिक्षक, गणेश बिरादार सो, अप्पर पोलीस अधिक्षक, सुदर्शन राठोड सो, उप. विभागीय पोलीस अधिकारी यांचें मार्गदर्शनाखाली, स.पो.नि. मनोजकुमार नवसरे, पो.स.ई. जिनेश कोळी, पोसई ताकवणे, पो.हवा. रुपेश साळुंके, संदिप लोंढे, विशाल गजरे, पो.कॉ. तुषार जैनक सागर वाघमोडे, संतोष जावीर, महादेव साळुंके, किसन ताडगे, सचिन दरेकर, आदेश मवाळ, सोमनाथ होले, म.पो.शि. तावरे, नेवसे यांनी केलेली आहे.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test