सोमेश्वर वाचनालय येथे जागतिक महिला दिन साजरा
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील सोमेश्वर वाचनालय येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला आज 8 मार्च रोजी सोमेश्वर वाचनालय, सोमेश्वरनगर यांच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन जिल्हा परिषद शाळा वाघळवाडी मधील महिला शिक्षक व विद्यार्थिनी तसेच सोमेश्वर सह साखर कारखाना लि. ऊसतोड कामगार महिला भगिनींचा गुलाबपुष्प देऊन सत्कार सन्मान करण्यात आला.
वाचनालयाचे सहा.ग्रंथपाल धनश्री जगताप यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले . तसेच वाचनालयाचे अध्यक्ष कल्याण जगताप,प्रा अजय दरेकर, डॉ संजु जाधव, उदय जगताप, अनिल निगडे ,प्रा रवींद्र होळकर, अनिल भोसले सर्व संचालक व ग्रंथपाल अजित जगताप यांनी शुभेच्छा दिल्या