Type Here to Get Search Results !

सुपा पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाने तक्रारदार यांचे हरवलेले ३ लाख १५ हजार रू किंतचे १७मोबाईल फोन हस्तगत करून तक्रारदार यांना परत करण्यात यश


सुपा पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाने तक्रारदार यांचे हरवलेले ३ लाख १५ हजार रू किंतचे १७मोबाईल फोन हस्तगत करून तक्रारदार यांना परत करण्यात यश
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील सुपा पोलीस स्टेशन हददीतील विविध तक्रारदार यांनी त्यांचे मोबाईल गहाळ झालेबाबत सुपा पोलीस स्टेशन येथे तकारी दाखल केल्या होत्या सदर तक्रारींची दखल घेवुन गहाळ मोबाईलचा शोध घेवुन ते हस्तगत करणेबाबतचे आदेश मा. सहा. पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे यांनी सुपा गुन्हे शोधपथकाचे अंमलदार किसन ताडगे, महादेव साळुंके यांना दिले होते. त्यावरून गहाळ मोबाईलची तांत्रीक दृष्टया तपास करून त्याचे विश्लेषण करून एकुण १७ विविध कंपनीचे मोबाईल फोन किंमत अंदाजे एकुण ३,१५०००/- रू. विविध भागातुन तसेच परराज्यातुन हस्तगत केले आहेत. सदरचे हस्तगत केलेले मोबाईल मनोजकुमार नवसरे सो, प्रभारी अधिकारी सुपा पोलीस स्टेशन यांचे हस्ते तक्रारदार यांना सुपुर्द केलेले आहेत. त्याबाबत तक्रारदार यांनी सुपा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी मनोजकुमार नवसरे व गुन्हेशोध पथकाचे अभार मानले आहेत.

सदरची कामगीरी पंकज देशमुख सो पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण, गणेश बिरादार सो, अप्पर पोलीस अधिक्षक बारामती, सुदर्शन राठोड सो उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती यांचे मार्गदर्शनाखाली मा. सहा. पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे सुपा पोलीस स्टेशन, गुन्हे शोधपथकाचे पो.हवा. रूपेश साळुंके, पो. हवा. विशाल गजरे, पो.शि.किसन ताडगे, महादेव साळुंके सुरज साळुंके, तुषार जैनक यांचे पथकाने केली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test