स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी 'सोमेश्वर पॅटर्न' अभ्यासिका; मैदानाची सोय, नागरिकांच्या सहभागाने ५४ जणांकडून यशाला गवसणी
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथे अभ्यासिका, मैदानाची सोय आणि नागरिकांचा सहभाग यामुळे सोमेश्वर परिसरात अभ्यासूंना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे नुकत्याच लागलेल्या निकालांमध्ये चोपन्न विद्यार्थ्यांनी यश पटकाविले असून, यशाचा 'सोमेश्वर पॅटर्न' निर्माण केला आहे. या यशवंतांचा बारामतीचे पोलिस उपविभागीय अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
परिसरातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी करंजेपूल (ता. बारामती) येथे गणेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली विवेकानंद अभ्यासिका कार्यरत आहे. त्याव्दारे मागील वर्षी स्पर्धा परीक्षेमध्ये यश संपादित केलेल्या विद्यार्थ्यांसमवेत मान्यवर.त्रेचाळीस जणांना यश मिळाले होते. यावर्षी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाव्दारे पाच जण पीएसआय, सहा जण महसूल सहायक, तीघे स्थापत्य अभियंता तर चाळीस पोलिस झाले आहेत. चंद्रस्मृती अभ्यासिका, कृष्णाली अभ्यासिकेनेही यात भर टाकली आहे. सर्वजण छोट्या वाड्या वस्त्यांवरील सामान्य कुटुंबातील आणि सरकारी शाळांतील विद्यार्थी आहेत. काकडे महाविद्यालयाने मैदान, सोमेश्वर शिक्षण मंडळ, रिव्हॉल्युशन अकादमीने सभागृह उपलब्ध केले आहे.गणेश सावंत, विक्रम बोंद्रे, उमेश रूपनवर टेस्ट सिरीज तर अंकुश दोडमिसे व चेतन कोळपे मोफत मैदानी चाचणी घेतात. श्रीकांत पाटील,महेंद्र जमदाडे, सतीश करे,महेश काळे,रणजीत फरांदे,दिनेश मस्के आदी विषय निहाय मार्गदर्शन करतात. पुरुषोत्तम जगताप, आर. एन. शिंदे, संतोष कोंढाळकर, दिलीप फरांदे ,हेमंत गायकवाड,शेखर भगत, आण्णा भुजबळ,विराज येळे, राहुल गोलांडे,बाळासाहेब शेंडकर, दत्तात्रय जगताप,राजू बडदे, मयूर शेंडकर यांनी गरजू मुलांना आर्थिक मदतही केली असून त्यातूनच लोक सहभागाचा सोमेश्वर पॅटर्न तयार झाला.