स्व. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ सोमेश्वरनगर पंचक्रोशी कडकडीत बंद
सोमेश्वरनगर - स्व. संतोष देशमुख यांच्या निघृण हत्येच्या निषेधार्थ आणि आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा मिळावी, यासाठी बारामती शहर व तालुक्यातील सोमेश्वरनगर येथे रविवार दि. ९ रोजी सोमेश्वरनगर व पंचक्रोशीतील गावांमधून मराठा क्रांती मोर्चाने बंदची हाक दिली आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यापाऱ्यांनी बंद पाळून सहकार्य करण्याचे आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात होते या आव्हानाला प्रतिसाद देत सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.