सोशल मिडीयाचा गैरवापर करताय? तर मग सावधान !!
इन्स्टाग्रामवर फोटो व अश्लिल मजकुराची स्टोरी टाकणाऱ्या युवकाचा शोध घेत अटक
इन्स्टाग्रामवर अल्पवयीन शालेय विदयार्थीनीचा फोटो व अश्लिल मजकुराची स्टोरी टाकणाऱ्या युवकाचा पोलीसांनी घेतला शोघ व केली अटक
बारामती प्रतिनिधी:- आजचे आधुनिक इंटरनेटचे युगात फेसबुक, इन्स्टाग्राम, स्नॅपचॅट इ. सारखे अनेक समाजमाध्यम (सोशलमिडीया) प्लॅटफॉर्म उपलब्ध असुन त्यातुन एक स्वतंत्र आभासी दुनिया निर्माण झालेली आहे, अनेक तरुण- तरुणी या आभासी दुनियेत वावरत असताना मनाला वाटेल तसा समाजमाध्यमांचा गैरवापर करीत असलेबाबत अनेक प्रकार घडत आहेत.
माळेगाव पोलीस ठाणे कार्यक्षेत्र अंतर्गत एका गावात वास्तव्यास असणाऱ्या व इ. 09 वी. मध्ये शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन शालेय मुलीच्या फोटो वापरुन त्या फोटोवर तीचे चारीत्र्याविषयी बदनामी होईल, असे जाणीवपुर्वक अश्लिल स्वरुपाचे मजकुर लिहुन त्याची इन्स्टाग्राम या समाजमाध्यमावर खाते (अकांऊंट) तयार करुन त्यावर स्टोरी ठेवलेचा प्रकार संबंधित शालेय विदयार्थिनीचे वडीलांना व कुटुंबियांना माहीती मिळाल्यानंतर पिडीत शालेय विदयार्थिनीचे वडीलांनी घडले प्रकाराबाबत माळेगाव पोलीस ठाणे येथे तकारी अर्ज / फिर्याद नोंदविलेने त्या अनुषंगाने माळेगाव पोलीस ठाणे येथे गु.र.नं 26/2025 भारतीय न्याय संहीता 2023 चे कलम 79, सह बालकांचे लैगिंक अपराधापासुन संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 12 तसेच माहीती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 67. 67 अ, या प्रमाणे गुन्हा दाखल होवुन सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक श्रीमती वैशाली पाटील, बारामती तालुका पोलीस ठाणे यांचेकडे दिलेला होता.
सदर गुन्हयाचे फिर्यादीमध्ये फिर्यादी यांनी नमुद केलेली तकारीचा आशय व वस्तुस्थिती ही गंभीर स्वरुपाची असलेने तसेच काहीएक कारण नसताना एका अनोळखी इसमाने समाजमाध्यमाचा गैरवापर करुन बदनामी होईल, अशी कृती केलेने पिडीत मुलीसह संपुर्ण कुटुंबातील सदस्यांचे सामाजिक आयुष्यावर गंभीर परीणाम होण्याची शक्यता निर्माण झालेने सदर गुन्हयाचे गांभीर्य ओळखुन सदरचा गुन्हा उघडकीस आणणेचे दृष्टीकोनातुन अज्ञात आरोपीचा शोध घेणेकरीता तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक श्रीमती वैशाली पाटील यांनी माळेगाव पोलीस ठाणे स्तरावर तपास पथक तयार करुन त्यांना सदर गुन्हा उघडकीस आणणेबाबत आदेशित केलेले होते.
सदर आदेशाचे अनुषंगाने सदर गुन्हयात वापरले इन्स्टाग्राम खाते (अकांऊंट) व त्याचा वापर करणारे अज्ञात आरोपीची माहीती शोधणेकरीता माळेगाव पोलीस ठाणे कडील स.पो.नि. श्री. सचिन लोखंडे यांचे सुचनेनुसार पोलीस नाईक श्री. ज्ञानेश्वर सानप यांनी इन्स्टाग्राम व फेसबुक या समाजमाध्यम चालविणाऱ्या मेटा प्लॅटफॉर्म या अमेरिकास्थित जागतिक कंपनीच्या कार्यालयाकडे संबंधित इन्स्टाग्राम खातेची माहीती मिळणेकरीता पत्रव्यवहार करुन त्यांचेकडुन माहीती प्राप्त करुन घेवुन त्या माहीतीचे तांत्रिक विश्लेषणाचे आधारे सदरचा गुन्हा हा पवन राजेंद्र क्षिरसागर वय 21 वर्ष, रा. ढाकाळे ता. बारामती जि.पुणे यानेच केला असलेबाबत खात्रीशीर माहीती मिळाल्याने सदर गुन्हयाचे चौकशीकामी पवन राजेंद्र क्षिरसागर यांस माळेगाव पोलीसांनी ताब्यात घेवुन त्याचेकडे सखोल चौकशी केली असता त्याने वरील नमुद गुन्हा केलेची कबुली दिलेमुळे पवन राजेंद्र क्षिरसागर या युवकास सदर गुन्हयाचे कामी अटक करणेत आलेली आहे, तसेच त्याने गुन्हा करण्यासाठी वापरलेला त्याचे ताब्यातील मोबाईल गुन्हयाचे कामी जप्त करणेत आलेला असुन सदर आरोपीस मा. न्यायालयात हजर केले असता गुन्हयाचे पुढील चौकशी करीता मा. न्यायालयाने त्याची दिनांक 01/04/2025 रोजी पर्यंत पोलीस कोठडी मंजुर केलेली आहे.
सदरची कामगिरी ही पंकज देशमुख सो. (भा.पो.से) पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, गणेश बिरादार सो., अपर पोलीस पोलीस अधीक्षक, बारामती विभाग.डॉ. सुदर्शन राठोड सो. उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती उपविभाग, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीमती वैशाली पाटील, बारामती तालुका पोलीस ठाणे व तपास पथकातील माळेगाव पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी स.पो.नि. सचिन लोखंडे, पोलीस उपनिरीक्षक तुषार भोर, पोलीस नाईक श्री. ज्ञानेश्वर सानप गोपनीय विभाग यांनी केलेली आहे.