सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील करंजे येथील सचिन शिवाजी क्षीरसागर यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. ते काही दिवसांपासून पोटाच्या आजाराने त्रस्त होते त्यांना बारामती तसेच पुणे येथील हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी नेण्यात आले होते परंतु रविवारी रात्री त्यांचे निधन झाले ते ३९ वयाचे होते.
त्यांच्या पश्चात आई वडील ,पत्नी पुजा, दोन मुली प्राजक्ता ,ऋतुजा एक मुलगा आर्यन ,विवाहित एक भाऊ राहुल क्षीरसागर,दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे.
मु सा काकडे महाविद्यालयात स्टोअर विभागात कार्यरत असणारे तसेच सर्वांशी आदर युक्त मनमिळावू स्वभाव अशी सर्वत्र ओळख ... सचिन च्या निधनाने करंजे व सोमेश्वर पंचक्रोशीतील नागरिक हळहळ व्यक्त करत आहे.
अंत्यविधी करंजे येथील स्मशानभूमी येथे आज सोमवार दि ३१ रोजी ११:३० ते १२(दुपारी ) वाजता होईल.