सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील सोमेश्वर येथील शरदचंद्र पवार अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय सोमेश्वरनगर येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे सेवानिवृत्त प्राध्यापक रवीदास पाटसकर, सचिनधुळे, चेतनकुमार सकुंडे, संस्थेचे सचिव भारत खोमणे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय देवकर, उपप्राचार्य डॉ. शरद गावडे, विधार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात शिवप्रतिमेचे पुजन आणि दिपप्रज्वलनाने झाली. यानंतर महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीने शिवाजीमहाराजांच्या जीवनावर आधारित पोवाडे सादर केले. कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे सेवानिवृत्त प्राध्यापक रवीदास पाटसकर यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित आपले विचार व्यक्त केले. या भाषणा मध्ये त्यानी शिवरायांच्या प्रेरणादायी नेतृत्व, शिस्तबद्ध, राज्यव्यवस्था आणि स्वराज्यासाठी दिलेल्या महान त्यागावर प्रकाश टाकला.
छत्रपती शिवाजीमहाराजांच्या शिकवणींनी प्रेरित होत समाजहिता साठी कार्य करण्याचा निर्धार विद्यार्थ्यांनी करावा, त्यांचा संपूर्ण इतिहास जाणून घ्यावा अशा भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केल्या. या कार्यक्रमाचे संयोजन महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षकवर्ग यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन महाविद्याल याचा विद्यार्थी प्रदिप कदम याने केले व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन हे विराज जगताप याने केले.