Type Here to Get Search Results !

राम नवमी,रमजान ईद, गुढीपाडवा सणांचे अनुषंगाने वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे हद्दीत रूट मार्च.

राम नवमी,रमजान ईद, गुढीपाडवा सणांचे अनुषंगाने वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे हद्दीत रूट मार्च.
सोमेश्वरनगर - राम नवमी,रमजान ईद, गुढीपाडवा सणांचे अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था राखणे कामी बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन  येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे , करंजेपूल दूरक्षेत्र चे पी एस आय राहुल साबळे यांच्या उपस्थितीत थील ग्राउंडवर दंगा काबु योजना रंगीत तालीम सराव  करण्यात आला . तसेच आगामी राम नवमी, रमजान ईद, गुढीपाडवा सण उत्सवाचे अनुषंगाने वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन येथे जातीय सलोखा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते सदर बैठकीस  ५० ते ६० जनसमुदाय उपस्थित होता उपस्थित जनसमुदायास  नवीन कायदेविषयक तसेच सोशल मीडियावरील स्टेटस, इन्स्टाग्राम वरील रिल्स याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.तसेच  दि. २४ रोजी सायंकाळी  आगामी रामनवमी,रमजान ईद, गुढीपाडवा सणांचे अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था राखणे कामी  मौजे वडगाव निंबाळकर, कोराळे बुद्रुक, तसेच सोमेश्वरनगर करंजेपुल या गावांचे ठिकाणी रूट मार्च घेण्यात आला आहे. तसेच तक्रार निवारण दिनाचे आयोजन करून विविध तक्रारदार यांचे तक्रारीचे निवारण करण्यात आले आले.

             
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test