Type Here to Get Search Results !

सोमेश्वरच्या चेअरमन संचालक मंडळाचे शेतकरी कृती समितीच्या वतीने अभिनंदन - सतिश काकडे

सोमेश्वरच्या चेअरमन संचालक मंडळाचे शेतकरी कृती समितीच्या वतीने अभिनंदन - सतिश काकडे
सोमेश्वरनगर - गेल्या ३ ते ४ दिवसापुर्वी चेअरमन यांनी सोमेश्वर कारखान्यामध्ये सोमेश्वरच्या चेअरमन संचालक मंडळाचे शेतकरी कृती समितीच्या वतीने अभिनंदन -झालेल्या गैरव्यवहाराबाबत टाईम ऑफीस चे सर्व अधिकारी व कर्मचारी यांना निलंबीत करून जो धाडसी निर्णय घेतला त्याबाबत त्यांचे संचालक मंडळ व एम डी या सर्वांचे कृतीसमिती अभिनंदन करत आहे. कारखान्याच्या इतिहासात अशी कारवाई प्रथमताच होत आहे त्याचे निश्चीत स्वागत व अभिनंदन केले पाहिजे. तसेच संचालक मंडळाने यावरच न थांबता टाईम ऑफीस मधील अधिकारी व कर्मचारी यांचेवर कारखान्यामार्फत तक्रार  देवुन या सर्वांवर गुन्हे दाखल करावेत कारण कारखाना अंतर्गत चौकशी करत असला तरी या सर्वांवर कायदेशीर कारवाई केल्यास त्यांना या सर्व कर्मचाऱ्यांवर कोर्टामार्फत पी.सी मिळु शकेल व त्यामाध्यमातुन गेले कित्तेक वर्ष कारखान्याचे नुकसान करत आहेत, नेमका किती कोटींचा भ्रष्टाचार झालेला आहे व नेमके आरोपी किती आहेत या सर्व गोष्टी कारखान्याच्या सर्व सभासदांना माहित होतील व भविष्यात असे प्रकार होता कामा नये म्हणुन कारखान्याच्या सर्व खात्यातील अधिकारी व कर्मचारी यांचेवर सुध्दा जरब बसेल म्हणुन त्वरीत कारवाई करण्यात यावी अशी कृती समितीच्या वतीने विनंती करण्यात येत आहे.

दुसरे कारण कृती समितीकडे जी माहिती आहे. यावरून हा भ्रष्टाचार कोट्यावधी रूपयांच्या घरात आहे. हा प्रकार गेली आठ वर्ष सुरू असुन या पैशामधुन संबंधीतांनी बारामती एम.आय.डी.सी भागात ४ ते ६ गुंठे जागा खरेदी केली असुन एका व्यक्तीने तर त्याच्या २ बहिणीसही प्रत्येकी २० ते २५ लाख रूपये दिले आहेत असेही समजते तसेच अशाच प्रकारचा भ्रष्टाचार सिव्हील विभागात देखील झाला असल्याची माहिती मिळते. तरी याचीही सखोल चौकशी कारखान्या अंतर्गत करण्यात यावी व तसे निदर्शनास आल्यास संबंधीतावर सुध्दा पोलीस स्टेशनला तकार देण्यात यावी की जेणे करून कारखान्यावर भविष्यात अशा प्रकारचे प्रकार घडु नये.

आता मार्च महिना सुरू असुन साधारण २ ते २.५ लाख मे.ट.न उस शिल्लक असुन कारखाना बंद झाल्यावर उर्वरीत बील देणार अशी माहिती चेअरमन यांनी दिली होती. परंतु ३१ मार्च असुन सभासदांना कर्जबाकी भरायची असलेने पैशाची आवश्यकता असुन उर्वरीत F.R.P कायद्यानुसार व्याजासह त्वरीत द्यावी की जेणे करून सभासदांना कर्ज भरता येतील. तसेच ज्या सभासदांचा उस गाळप झाला असुन ज्या सभासदांच्या कारखान्यावर अनामत म्हणुन रक्कम जमा आहे अशा सभासदांच्या रक्कमा सोसायटी कर्ज खाती वर्ग कराव्यात की जेणे करून त्या सभासदास व्याज सवलत मिळेल. कारखाना परिपत्रकाप्रमाणे उसाच्या तोडी करत नाही तसेच गेली २ ते ३ वर्ष तोडणी वाहतुकदार मोठ्या प्रमाणावर उस जळीत करून आणत आहेत त्याचा भुर्दंड सभासदांना बसत आहे. परिणामी सभासदांचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकी ऑफीसने तोडणी वाहतुकदारांवर नियंत्रण ठेवावे व याबाबत कठोर पाउले उचलावीत अशी मागणी कृती समिती करत आहे. आजपर्यंत मोठया प्रमाणावर सभासदांचा उस बाहेरील कारखान्यांना गेला आहे. त्यामुळे चेअरमन यांनी ज्या सभादांनी उस बाहेरील कारखान्यांना दिला आहे त्या सभासदांना नोटीस पाठवुन त्यांना कारखान्यामार्फत मिळणाऱ्या सवलती बंद करण्याच्या नोटीशा पाठविल्या आहेत त्या तात्काळ परिपत्रक काढुन मागे घेण्यात याव्यात व सभासदास साखर व इतर सवलती पासुन वंचीत ठेवण्यात येवु नये तसेच मागील वर्षी ज्या प्रमाणे जानेवारी पासुन तुटणाऱ्या उसास अनुदान जाहीर केले होते त्याप्रमाणे या वर्षी देखील जानेवारी पासुन ते कारखाना बंद होईपर्यंत तुटणाऱ्या उसास अनुदान जाहीर करावे. माळेगाव कारखान्याचा ९९ टक्के उस बाहेरील कारखान्यास जात नाही या उलट आपला उस बाहेरील कारखान्यास का जात आहे याचे आत्मपरिक्षण चेअरमन संचालक मंडळाने करावे. तरी सभासदांच्यावर कोणतीही कारवाई न करण्याची विनंती कृती समिती करीत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test