आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना बुधवारी महाराष्ट्र विधानसभेचे कामकाज प्रत्यक्ष पाहण्याचा अनुभव.
सोमेश्वरनगर - उत्कर्ष माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना बुधवारी महाराष्ट्र विधानसभेचे कामकाज प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळाली विधानसभा अधिक आणि विधान परिषदेतील आमदारांचे प्रश्नोत्तर आणि चर्चा ऐकून विद्यार्थी आनंदित झाले. राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण आणि दुग्ध विकास मंत्री अतुल सावे यांच्या संकल्पनेतून पुणे विभागातील 100 विद्यार्थ्यांना विधानभवनाचे प्रत्यक्ष कामकाज अनुभवता आले. OSD नानासाहेब कदम, विभागीय प्रादेशिक आयुक्त खुशाल गायकवाड यांच्या नियोजनातून विधानभवन आणि छ. शिवाजी महाराज संग्रहालयाला भेट देता आली. यावेळी वस्तुसंग्रहालयाचा इतिहास,कार्य, टॅक्सीडर्मी याविषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. विधानभवनाची भेट विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय ठरली. विधानभवनाचा आदर, तिथे बोलण्याची पद्धत, सुरक्षा आणि मंत्री अतुल सावे यांच्या भेटीने विद्यार्थी भारावून गेले. या संपूर्ण अभ्यास दौऱ्यासाठी विशेष कार्य अधिकारी नानासाहेब कदम, पुणे विभागीय प्रादेशिक आयुक्त खुशाल गायकवाड यांनी विशेष परिश्रम घेतले. उत्कर्ष आश्रमशाळेतील प्रत्येकी 5 मुला मुलींना तसेच शिक्षक रोहिदास कोरे, अनिता उघडे यांना या अभ्यास दौऱ्यासाठी संधी मिळाली.