स्तुत्य उपक्रम ! नातेपुते येथे रक्तदान शिबीर उत्साहात
वाल्हे प्रतिनिधी (सिकंदर नदाफ ) - सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम गायकवाड तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली नातेपुते येथील पोलीस ठाण्यात रक्तदान शिबीर उत्साहात पार पडले.
यावेळी रक्तदान शिबिरासाठी ज्ञानदीप ब्लड बँक नातेपुते यांच्या वतीने येथील पोलीस ठाण्यात ५० खाटा तसेच ५५ आरोग्य सेवकांसह तज्ञ डॉक्टरांची नेमणूक करण्यात आली होती.तर या शिबिरात जवळपास ९०० रक्तदात्यांनी विक्रमी रक्तदान केले आहे.या दरम्यान नातेपुते पोलीस ठाण्याच्या वतीने रक्तदात्यांचा विशेष सन्मान करण्यात आला .
या कार्यक्रमास प्रभारी अधिकारी महारुद्र परजणे यांसह ३१ गावातील ग्रामस्थ तसेच पोलीस पत्रकार व विविध सामाजिक मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.