सोमेश्वरनगर प्रतिनिधी - बारामती तालुक्यातील वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशन आयोजित गुन्हयातील जप्त दागीने व रोख
रक्कम फिर्यादीस प्रदान सभारंभ दिनांक ६/३/२०२५
वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशन गु.रजि.नंबर ३७/२०२५ भा.न्या.स. कलम ३३१(३), ३०५ (अ), मधील जप्त दागीने व रोख रक्कम असा एकुण २,४९,०००/- रूपये किमतीचा मुद्येमाल फिर्यादी सचिन विठ्ठल करे वय ३७ राह- पळशी ता. बारामती जि.पुणे. असा चोरी घरफोडी मधील जप्त केलेला मुद्येमाल मा. श्री पंकज देशमुख, पोलीस अधीक्षक, सो पुणे ग्रामीण., मा.श्री गणेश बिरादार, अपर पोलीस अधिक्षक, सो बारामती विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली सुदर्शन राठोड उपविभागीय पोलीस अधिकारी सो बारामती उपविभाग, बारामती यांचे शुभहस्ते फिर्यादी यांना परत करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा तपास सचिन काळे स.पो.नि वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशन यांनी केला आहे.फिर्यादी सचिन विठ्ठल करे वय ३७ राह- पळशी ता. बारामती जि.पुणे. यांनी चोरीस गेलेला मुद्येमाल पोलीसांनी पुढाकार घेवुन कमी सायासामध्ये कोर्ट कचेरीच्या फेच्या न मारता ताब्यात मिळाल्याने आनंद व्यक्त करून पंकज देशमुख, पोलीस अधीक्षक, सो पुणे ग्रामीण गणेश बिरादार, अपर पोलीस अधिक्षक, सो बारामती विभाग, व सुदर्शन राठोड उपविभागीय पोलीस अधिकारी सो बारामती उपविभाग, बारामती यांचे आभार व्यक्त केले आहेत.