सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर.कारखान्याच्या वजनकाट्यांची वैध मापनशास्त्र विभागाच्या पथकाने अचानक भेट देऊन पाहणी केली. याप्रसंगी केलेल्या तपासणीमध्ये सर्व पाचही वजनकाटे अचूक ठरले आहेत, अशी माहिती तहसीलदार गणेश शिंदे यांनी दिली. सोमेश्वर कारखान्याच्या मिलशेजारी असलेल्या वाहनतळावर शुक्रवारी दुपारी तहसीलदार गणेश शिंदे, वैध मापनशास्त्र विभागाचे निरीक्षक राजेंद्र टाळकुटे, यांच्यासह वैधमापनशास्त्र विभागाच्या अधिकाऱ्यांनी अचानक भेट दिली. साखर संकुलातील द्वितीय लेखापरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक राहुल साबळे आदींचा पथकात समावेश होता. वाहनतळावरील वजनकाट्यावर वजन करून पावतीसह गव्हाणीकडे ऊस खाली करण्यासाठी निघालेल्या दोन ट्रॉली आणि एक बैलगाडीस परत बोलाविण्यात आले. पुन्हा या वाहनांच्या वजनाची फेरतपासणी केली. याशिवाय कारखान्याचे वेगवेगळ्या वजनाचे पाचही वजनकाट्यांची संपूर्ण तांत्रिक तपासणी केली. त्यानंतर वजनकाटे अचूक असल्याचा अहवाल कारखान्यास सुपूर्द केला. याप्रसंगी को-हाळे बुद्रुक येथील जनार्दन पवार, विनायक खोमणे हे शेतकरी व काही वाहनचालक यांच्यासह कारखान्याचे इन्ट्रूमेंट इंजिनिअर श्रीकांत दरंदले, शेती अधिकारी बापूराव गायकवाड उपस्थित होते.
सोमेश्वरनगर ! सोमेश्वर सह.कारखान्याचे वजनकाटे अचूक ठरले - गणेश शिंदे
March 02, 2025
0
सोमेश्वरनगर ! सोमेश्वर सह.कारखान्याचे वजनकाटे अचूक ठरले - गणेश शिंदे
Tags