Crime News सुपा पोलीस स्टेशनची अवैध्य गावठी हातभटट्टीची दारू वाहतुक करणा-यावर कारवाई.
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील सुपा पोलीस स्टेशनची अवैध्य गावठी हातभटट्टीची दारू वाहतुक करणा-यावर कारवाई दि२२रोजी दुपारी १ च्या सुमारास मोरगाव हद्दी येथे पेट्रोलिंग करीत असताना पो.स.ई. जयवंत ताकवणे पोलीस अंमलदार सचिन दरेकर सागर वाघमोडे, संतोष जावीर यांना बामतीदारा मार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की, पोलीस स्टेशन हददीतुन एक चारचाकी टेम्पो मधुन गावठी हातभटट्टी देशी दारूची वाहतुक होणार आहे. अशी माहिती मिळाल्याने सदरची माहीती प्रभारी अधिकारी मनोजकुमार नवसरे, सहायक पोलीस निरीक्षक यांना सांगुन त्यांचे मार्गदर्शनाखाली पो.स.ई. जयवंत ताकवणे पोलीस अंमलदार सचिन दरेकर सागर वाघमोडे, संतोष जावीर, यांनी मोरगाव परिसरात पेट्रोलिंग करीत असताना मोरगाव चौक येथे एक टेम्पो गाडी नं. एम एच ४२ ए क्यु २०१० ही गाडी थांबवुन गाडीची झडती घेतली असता त्यामध्ये ३५ लीटर क्षमतेचे १३ कॅन्ड अवैध्य गावठी हातभटट्टी दारू त्यामध्ये ४५५ लिटर दारू किंमत ४५ हजार व एक अवैदय दारुची वाहतुक करणारा टेम्पो किंमत ३ लाख ५० हजार असा एकुन ३ लाख ९५ हजार रुपये किंचा मुदद्देमाल मिळुन आला आहे. सदर बाबत चारचाकी टेम्पो वरील चालक नामे अभिजीत मोहन शिंदे रा. माळेगाव ता. बारामती जि पुणे यांना ताब्यात घेतलेले आहे. सुपा पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नं ३६/२०२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पो.स.ई जयवंत ताकवणे हे करीत आहेत.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधिक्षक साो लपंकज देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक गणेश बिरादार, मा.उप. विभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांचें मार्गदर्शनाखाली, स.पो.नि. मनोजकुमार नवसरे, पो.स.ई. जिनेश कोळी, जयवंत ताकवणे पो. हवा. रुपेश साळुंके, राहुल भाग्यवंत, संदिप लोंढे, विशाल गजरे, पो. कॉ. सचिन दरेकर, सागर वाघमोडे, संतोष जावीर, तुषार जैनक, महादेव साळुंके, किसन ताडगे, पियुश माळी, सुरज साळुंखे यांनी केलेली आहे.