सोमेश्वरनगर - शिवजयंती व महाशिवरात्रीनिमित्त सोमेश्वर मंदीर, करंजे (ता.बारामती) श्री सोमेश्वर सेवाभावी संस्था, सोमेश्वर यांनी आयोजन केले व विशेष सहकार्य श्री सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट करंजे, भारतीय पत्रकार संघ बारामती, आजी माजी सैनिक संघटना, सोमेश्वरनगर भाविक भक्त व समस्त ग्रामस्थ सोमेश्वरनगर पंचक्रोशी या रक्तदान शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद रक्तदात्यांनी नोंदवला व शिबिरात १२५ बॉटल रक्त संकलित झाले.
साई सेवा मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल च्या वतीने मोफत आरोग्य तपासणी आयोजन डॉ विद्यानंद भिलारे व डॉ राहुल शिंगटे यांच्या माध्यमातून शिवभक्तांची आरोग्य तपासणी मोफत करण्यात आली आठवड्यातील दर सोमवारी सोमेश्वर मंदिर येथेही आलेले शिवभक्तांची आरोग्य तपासणी मोफत करत असतात त्यामुळे त्यांचे परिसरातून कौतुक होत असते असे बोलताना मान्यवरांनी आवर्जून सांगितले.
या शिबिराचे उदघाटन बांधकाम व आरोग्य समिती माजी सभापती प्रमोद काकडे, बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राजवर्धन शिंदे, क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, माजी सभापती निताताई फरांदे, श्री सोमेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अनंत मोकाशी, सामाजिक कार्यकर्त्या सुचित्रा साळवे, सोमेश्वर कारखान्याचे संचालक संग्रामभाऊ सोरटे, मिलिंद कांबळे, लक्ष्मण गोफणे, विक्रम भोसले उद्योजक संतोषराव कोंढाळकर, सोमेश्वर सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सुखदेवराव शिंदे आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
श्री सोमेश्वर सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सुखदेवराव शिंदे यांच्या संकल्पनेतून महाशिवरात्री निमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. शिबीर नियोजन बालाजी ब्लड सेंटर लोणंद यांनी केले.
सोमेश्वर सेवाभावी संस्थेच्या वतीने अध्यक्ष सुखदेव शिंदे हे नियमित अनेक सामाजिक उपक्रम राबवित असतात. त्यांनी राबविलेल्या उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असतो.
याप्रसंगी बारामती दूध संघाचे चेअरमन संजय कोकरे, अनिल दादा खलाटे ,तुषार कोकरे, पंकज निलाखे, करंजे सरपंच भाऊसाहेब हूंबरे, उपसरपंच विष्णू दगडे, शिवाजी शेंडकर ,बाळासाहेब शिंदे ,दिग्विजय जगताप, आजी माजी सैनिक संघटना अध्यक्ष बाळासाहेब शेंडकर, पुणे जिल्हा स्थापत्य अभियंता गणेश शेंडकर,भारतीय पत्रकार संघ सातारा जिल्हा अध्यक्ष संदीप जाधव, बारामती तालुकाध्यक्ष विनोद गोलांडे, सचिव सुशीलकुमार आढागळे,काशिनाथ पिंगळे, अजित जगताप तसेच संताजीराव गायकवाड, प्रतापराव गायकवाड, आदी मान्यवर तसेच भाविक भक्त उपस्थित होते.