सोमेश्वरनगर - उपमुख्यमंत्री अजित पवार हे नेहमीच हजर जबाबी, दर्जेदार कामे आणि स्वच्छता बाबतीत ओळखले जातात या अनुषंगानेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजितदाद पवार गट ) सोरटेवाडी येथील युवा नेते राजीव सोरटे व सुभाष धुर्व यांनी बारामती तालुक्यातील प्रसिद्ध सोरटी सोमनाथ प्रति रूप मानले जाणारे श्री सोमेश्वर देवस्थान,करंजे येथे महाशिवरात्रीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या फोटोची प्रतिकृती स्केच व त्यावर "आमचा नेता आमचा अभिमान"व एका बाजूला सामाजिक संदेश म्हणून "स्वच्छ सुंदर बारामती" असलेल्या तब्बल दोन हजार पिशवी आणि त्या समवेत बारामतीचे प्रसिद्ध वकील श्रीनिवास वायकर यांच्या मार्फत असलेली चक्की आणि केळी उपस्थित शिवभक्त भाविकांना व श्री सोमेश्वर सेवाभावी संस्थेच्या वतीने व साई सेवा मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल यांच्या माध्यमातून रक्तदान शिबिरामधील रक्तदात्यांना ही मोफत पिशवी वाटप स्वच्छतेचा संदेश देण्यात आला असल्याने .
या आगळ्या वेगळ्या उपक्रमाबद्दल सोमेश्वर परिसरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या एककनिष्ठ कार्यकर्त्यांचे कौतुक होत आहे.