Type Here to Get Search Results !

...ते तीन गावगुंड तडीपार ; गुन्हेगारांना जरब बसविण्यासाठी पोलीसांचा आक्रमक पवित्रा.

....ते तीन गावगुंड तडीपार ; गुन्हेगारांना जरब बसविण्यासाठी पोलीसांचा आक्रमक पवित्रा.
बारामती - बारामती तालुक्यातील माळेगाव पोलीस ठाणे तसेच वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात नागरीकांना जिवे मारण्याचा प्रयत्न करणे, बेकायदेशीर जमाव जमवुन नागरीकांना मारहाण करणे, घातक शस्त्रांचा वापर करून दहशत निर्माण करणे, नागरीकांना जबर दुखापत करणे तसेच शालेय विदयार्थिनी व महीलांची छेडछाड करणे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या माळेगाव पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील मौजे कांबळेश्वर ता. बारामती जि. पुणे या गावातील सुरज पांडुरंग जाधव, वय-२५ वर्षे, चेतन पांडुरंग जाधव, वय-२४ वर्षे व अर्जुन बाळासो आडके, वय-२२ वर्षे रा. सर्व कांबळेश्वर, ता. बारामती जि. पुणे यांचेमुळे सर्वसामान्य लोक, शालेय विदयार्थी, मजुर व नोकरदार वर्ग यांचेत त्यांचेबदद्ल भीती व असुरक्षिततेची भावना निर्माण झालेची माहीती मिळाल्याने अशा स्वरुपाच्या गुन्हेगारी प्रवृत्तीला वेळीच आळा बसावा व त्यांचेवर कायदयाचा धाक राहणे आवश्यक असलेने त्यांना संपुर्ण पुणे ग्रामीण जिल्हयातुन तडीपार करावे या करीता माळेगाव पोलीस ठाणे कडून वरील नमुद इसमांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५५ अन्वये मा. पंकज देशमुख सारे, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांच्या कार्यालयास प्रस्ताव सादर करणेत आलेला होता.

सदर तडीपार प्रस्तावाची मा. पोलीस अधीक्षक सो. पुणे ग्रामीण यांनी सखोल चौकशी करुन वरील नमुद इसमांना संपुर्ण पुणे जिल्हा हद्दीमधून (पुणे शहर पोलीस आयुक्तालय व पिंपरी चिंचवड शहर आयुक्तालय सह) ०१ वर्षे कालावधी करीता तडीपार करणेचे आदेश दिलेने त्यांना पुणे जिल्हयातून ०१ वर्षे कालावधी करीता तडीपार करण्यात आलेले आहे.

सदरची कारवाई मा. पंकज देशमुख सारे, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण गणेश बिरादार सो. अपर पोलीस पोलीस अधीक्षक, बारामती विभाग सुदर्शन राठोड , उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती उपविभाग, अविनाश शिळीमकर, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, पुणे ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली माळेगाव पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी सचिन लोखंडे, प्रतिबंधक कारवाई विभागाचे पोलीस उपनिरीक्षक तुषार भोर, पो.कॉ. जालिंदर बंडगर यांनी केलेली आहे. सदर कामी त्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, पुणे ग्रामीण यांचेकडील स. फौ. महेश बनकर, पो. हवा. रामदास बाबर यांचे सहकार्य लाभलेले आहे.
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test