सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर विवेकानंद अभ्यासिकेने पोलीस भरतीच्या मुलांसाठी राबवलेल्या सोमेश्वर पॅटर्नचे घवघवीत यश नुकत्याच लागलेल्या मुंबई पोलीस दलात तब्बल १४ विध्यार्थी भरती झाले. भरती झालेल्या सर्व मुलांसाठी मार्गदर्शक म्हणून विवेकानंद अभ्यासिका या ठिकाणी मुलांचा अभ्यास आणि मैदानी सराव करून घेतला जातो तसेच मैदानी प्रशिक्षक व मार्गदर्शक शिक्षक म्हणून अंकुश दोडमिसे,महेंद्र जमदाडे,चेतन कोळपे, दिनेश मस्के, रमजान शेख, सतीश करे, महेश काळे, गणेश सावंत या सर्वांकडून सर्व भरती झालेल्या मुलांनी पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण घेतले.
नुकत्याच लागलेल्या मुंबई पोलीस दलात धनंजय गलांडे ,राजेश शिंदे, रोहित चोरमले ,सचिन शिंदे ,ऋतिक जावळे ,अक्षय चव्हाण , निकिता भोसले , आरती लिंबरकर ,पूजा लिंबरकर , श्रुती हुंबरे ,मुंबई पोलीस चालक निकाल-सागर मोरे
,मुंबई कारागृह निकाल -निखिल पानसरे , प्रगती गुलदगड , श्रद्धा देडे (गुलदगड ),पूजा लिंबरकर हे यश मिळवलेले विध्यार्थी आहेत
सोमेश्वरनगर मधील तरुण,तरुणी पोलीस भरती हे त्यांचे ध्येय ठेवून दिवस-रात्र मेहनत व कष्ट करून यश मिळवत आहे. परिसरातून सर्व मान्यवरांकडून मुलांचे सत्कार समारंभ कौतुक सोहळे संपन्न होत आहेत.परिसरातील लोकांकडून मुलांना शाब्बासकीची थाप दिली जात आहे. मागील तीन वर्षापासून तब्बल शंभरहून अधिक विद्यार्थी पोलीस दलात भरती झाली ही नक्कीच लक्षणीय बाब ठरत आहे.
-- विवेकानंद अभ्यासिका अध्यक्ष गणेश सावंत --