सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील विद्या प्रतिष्ठानचे सोमेश्वर इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्युनिअर कॉलेज सी.बी.एस.ई वाघळवाडी येथे मंगळवार दिनांक १८ फेब्रुवारी २०२४ रोजी शैक्षणिक वर्ष २०२४- २०२५ चा वार्षिक वितरण सोहळा पार पडला.
यावेळी पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक विभागासाठी स्वतंत्र कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात शिवछत्रपती मूर्तीपूजन व
दिपप्रज्वलनाने करण्यात आली. शिवजयंतीचे औचित्य साधून शाळेतील विद्यार्थिनी कौस्तुभि भोसले ने पोवाडा सादर केला. शालेय तसेच आंतरशालेय शैक्षणिक तसेच सह शैक्षणिक उपक्रमांमधील बक्षीसपात्र विद्यार्थ्यांना शाळेची माजी गुणवंत विद्यार्थिनी साक्षी खोमणे, पालक शिक्षक संघाचे सदस्य यांच्या हस्ते प्रमाणपत्र पदके देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी सर्व बक्षीसपात्र विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी बक्षीस स्वीकारत आपल्या पाल्यांचा आनंद द्विगुणीत केला. शाळेतील सर्व विद्यार्थी ,शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी व मुख्याध्यापक सचिन पाठक यांची उपस्थिती लाभली.
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियांका सवाणे, वर्षा मांढरे व ज्योती शिंदे यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन व यशस्वी संचलन रेशमा गावडे व त्यांच्या सहकारी शिक्षकांनी केले.