Type Here to Get Search Results !

'सदैव तयार रहा'मूलमंत्र मुलांनी प्रत्यक्ष अनुभवला

'सदैव तयार रहा'मूलमंत्र मुलांनी प्रत्यक्ष अनुभवला.
सोमेश्वरनगर- बारामती तालुक्यातील विद्या प्रतिष्ठानचे सोमेश्वर इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्युनिअर कॉलेज सी.बी.एस.ई वाघळवाडी येथील विद्यार्थ्यांनी स्काऊट व गाईड या जागतिक चळवळीचे प्रणेते बेडन पॉवेल यांच्या १६८ व्या जयंतीनिमित्त शाळेमध्ये स्वयंशिस्त, स्वावलंबन, श्रमप्रतिष्ठा या मूलमंत्रावर आधारित उपक्रम करत जयंती साजरी केली.
यावेळी इयत्ता ७ वी मधील स्काऊट व गाईडचे विद्यार्थी आर्यन भोसले ,सर्वज्ञ वायाळ, नुमित शिंदे, श्लोक होळकर, कैवल्य निरगुडे, श्रेया जगताप, स्पर्श जगताप ,अनुष्का शेंडकर, गिरीजा काकडे ,आर्या दरेकर व प्रांजल गायकवाड या विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरामध्ये चुलीवर भाकरी ,भात व भाजी बनवत स्नेह भोजनाची व्यवस्था केली.
यावेळी इतर स्काऊट व गाईड विद्यार्थ्यांनी त्यांना योग्य ती मदत करत हा उपक्रम यशस्वीपणे पूर्ण केला .याप्रसंगी सर्वच स्काऊट व गाईड विद्यार्थी व प्रशिक्षित शिक्षकांनी सहभोजनाचा आनंद लुटला.
या सर्व उपक्रमाला शाळेतील शिक्षिका रेश्मा गावडे ,प्रज्ञा पवार व राणी मिंड यांचे मार्गदर्शन लाभले. शाळेचे मुख्याध्यापक सचिन पाठक यांनी या स्तुत्य उपक्रमाबद्दल मुलांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test