सोमेश्वरनगर- विद्या प्रतिष्ठानचे सोमेश्वर इंग्लिश मिडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज सी.बी.एस.ई सोमेश्वरनगर येथे १४ फेब्रुवारी रोजी विद्या प्रतिष्ठान संस्थेतील अंतर शालेय कुस्ती सामने आयोजित करण्यात आले.
या सामनांसाठी प्रमुख पाहुणे डॉ. श्री. बाळासाहेब मरगजे प्राध्यापक काकडे कॉलेज शारीरिक शिक्षण विभाग व राष्ट्रीय कुस्ती खेळाडू उपस्थित होते. त्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन होऊन कुस्ती सामन्यांना औपचारिक सुरुवात करण्यात आली.
यावेळी विद्या प्रतिष्ठानच्या भोर, इंदापूर, बारामती, स्वामी चिंचोली व सोमेश्वरनगर या शाळांनी स्पर्धेत सहभाग घेतला व १४ वयोगटाखालील ३६ ते ७५ अशा विविध वजनी गटात तर १७ वयोगटाखालील ४८ ते ८० किलो वजन गटात स्पर्धा घेण्यात आल्या.
या स्पर्धेतून विविध वजन गटात उत्कृष्ट कामगिरी करत विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. यामध्ये वेदांत बंडल, (भोर) अभिनव जगताप (सोमेश्वरनगर), श्रेयश देवकाते (स्वामीचिंचोली) ,चैतन्य माने (इंदापूर ),राजवीर झांबरे (विनोद कुमार गुजर) या व अशा अनेक विद्यार्थ्यांनी बक्षीसे मिळवली.
या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन शाळेतील क्रीडा शिक्षक उर्मिला मचाले व रणजीत देशमुख यांनी केले. यावेळी बक्षीस पात्र विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक सचिन पाठक यांनी प्रमाणपत्र व पदक देऊन सन्मानित केले.
या स्पर्धेसाठी विविध शाळांमधील कुस्ती प्रशिक्षकांनी उपस्थिती दर्शवली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश कर्णवर यांनी केले.