सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील सस्तेवाडी येथे शिवशक्ती प्रतिष्ठान वतीने शिवजयंती दरवर्षीप्रमाणे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
दरवर्षी विविध गड किल्ल्यांवर जात शिवप्रेमी ज्योत आणली जाते , यावेळेस किल्ले पुरंदर येथून ज्योत आणण्यासाठी प्रस्थान केले किल्ले पुरंदरवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास दुग्ध अभिषेक कतर ज्योत प्रज्वलित केली
किल्ले पुरंदर वरून सस्तेवाडी (ता बारामती) युवकांनी पायी वारी करत ज्योत आणली १९ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता ज्योतीचे आगमन सस्तेवाडी येथे झाले यावेळी गावातील युवा नागरिक महिला यांनी ज्योतीचे पूजन मोठ्या उत्साहात ज्योतीचे पूजन केले तसेच संध्याकाळी सहा वाजता ज्योतीसह ग्राम प्रदक्षिणा घालण्यात आली .
यावेळी शिवाजी महाराजांची सजवलेल्या मूर्ती पुष्पहारने सजवलेल्या रथामध्ये विराजमान करण्यात आली व मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीस सस्तेवाडी ग्रामस्थ उपस्थित होते मिरवणूक निकमवस्ती, सस्तेवस्ती तर सस्तेवाडी आणण्यात आली.
यावेळी मंडळातील सदस्य नवनाथ साळुंके, सुशांत साळुंके, भालचंद्र भिलारे, नितीन साळुंके, शिवाजी साळुंके, युवराज मोरे, जितेंद्र निकम, राजेंद्र यादव ,संभाजी जगदाळे, सुरज जगदाळे, राजेंद्र साळुंके यांनी शिवजयंती चे आयोजन केले तर ज्योत घेऊन धावण्यासाठी ओंकार भिलारे, स्वरूप भिलारे, अक्षय टकले, रोहित सस्ते, ओंकार जगदाळे, संकेत साळुंके, सुशांत सस्ते, अनिकेत नरुटे यांनी विशेष परिश्रम घेतले
मिरवणुकीसाठी अंकुश लक्ष्मण साळुंके (सर) ,विकास जाधव, अक्षय बापूराव ढोणे, वैभव मारणे यांनी विशेष सौजन्य लाभले.