आयुक्ताने ५ वर्षांपासून प्रलंबित याचिकेवर दिले ४ आठवड्यात निकाल.... मदरसा दारुल उलुम मौलाना युनूसिया चे होणार सरकार कडून स्पेशल ऑडिट...!
बारामती : मदरसा दारुल उलुम मौलाना युनूसिया या संस्थेची सरकार कडून स्पेशल ऑडिट करण्यात येणार आहे. बारामतीतील सामाजिक कार्यकर्ते सोहेल बच्चूभाई शेख-बागवान यांच्या तक्रारींवर आणि मा.उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अनुषंगाने मदरसा दारुल उलूम मौलाना युनिसिया मा.धर्मदाय आयुक्ताने स्पेशल ऑडिट चे आदेश दिले आहेत. संस्थेच्या बँक खात्यात मोठ्या प्रमाणात मोठ्या रक्कमेची उलाढाल केल्याचे निदर्शनास येत असल्याने स्पेशल ऑडिट चे आदेश देण्यात आले आहे.
कुठल्याही संस्थेत आर्थिक अपहार, देणगी रक्कमेचे चुकीचा वापर निर्दर्शनात येता धर्मदाय आयुक्त हे तक्रारदार यांच्या पुराव्याचे आधारे तक्रार मध्ये तथ्य आढळ्यास, सहाय्य्क धर्मदाय आयुक्त आणि निरीक्षक अहवालाच्या आधारे त्या संस्थेचे महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट अधिनियम कलम ३३(४) च्या तरतुदीनुसार स्पेशल ऑडिट चे आदेश देतात. अँड सुशांत प्रभुणे यांनी तांत्रिक बाबी मा.उच्च न्यायालयाच्या समोर मांडल्या
मा. धर्मदाय आयुक्त यांनी मा. उच्च न्यायलाय यांचे आदेशाचे पालन करत शेख यांच्या अर्जावर तातडीने कार्यवाही करत मदरसा दारुल उलुम मौलाना युनूसिया संस्थेचे स्पेशल ऑडिट करण्याचे आदेश १० फेब्रुवारी २०२५ रोजी दिले, अँड शहानुर शेख यांच्या विशेष सहकार्याने आणि मार्गदर्शनाखाली मे.धर्मदाय कोर्टासमोर सोहेल शेख तक्रारदार यांनी स्वतः युक्तिवाद केला व निकाल त्यांच्या बाजूने मे.कोर्टाने दिला आहे.
जेव्हा कुठल्याही संस्थेमध्ये देणगी रक्कमेचे गैरवापर केले जाते किंवा कुठल्याही संस्थे मध्ये बेकायदेशीर आर्थिक उलाढाल दिसून येथे तेव्हाच सदर संस्थेचे स्पेशल ऑडिट करण्याचे आदेश दिले जाते.प्रस्तुत प्रकरणात शेख यांच्या तक्रारावर मा. धर्मदाय आयुक्त यांच्या कडून विलंब केला गेला तेव्हा फक्त आणि फक्त मा. उच्च न्यायलायकडून शेख यांना न्याय मिळाला. शेख यांची तक्रारीमध्ये तथ्य दिसून आले सदर मदरसा दारुल उलुम मौलाना युनूसिया मध्ये मोठ्या प्रमाणात पैशाची उलाढाल झालेली आहे व ह्या कारणावरून सदर संस्थेचे सरकार कडून दोन महिन्यात स्पेशल ऑडिट होणार आहे.