Type Here to Get Search Results !

बाहेरील कारखान्यांना ऊस घालणाऱ्या सभासदांच्या सर्व सवलती संचालक मंडळ बंद करणार - पुरुषोत्तम जगताप

बाहेरील कारखान्यांना ऊस घालणाऱ्या सभासदांच्या सर्व सवलती संचालक मंडळ बंद करणार - पुरुषोत्तम जगताप
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील श्री. सोमेश्वर सह. साखर कारखान्याने आज अखेर ९३ दिवसांमध्ये ८६१३८९ मे.टन ऊसाचे गाळप केले असून यामधून सरासरी ११.५१ टक्के साखर उतारा राखत ९८८२५० क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन घेतले. आपल्या साखर कारखान्याचे दैनंदिन साखर गाळप क्षमता ७५०० मे.टन प्रति दिन असतांना देखील प्रति दिवस ९२६२ मे. टनाच्या उच्चांकी सरासरीने आपण गाळप करत आहोत. तसेच आपल्या कारखान्याच्या को-जन प्रकल्पामधून ६,१४,३४,१३५ युनिट्सची वीजनिर्मिती केली असून ३,५७,५९,८९२ युनिट्सची वीजविक्री केलेली आहे. त्याचप्रमाणे कारखान्याच्या डिस्टलरी प्रकल्पातून ४२,६०,४०३ लिटर्स अल्कोहोलचे उत्पादन घेतले असून सोबत २३,१७,७२० लिटर्स इथेनॉलचे उत्पादन घेतलेले आहे. कोणताही साखर कारखाना जवळपास १५० दिवस पुर्ण क्षमतेने चालला पाहिजे तर त्याच्या कार्यक्षमतेचा पुर्ण वापर होतो. व सर्वांगाने फायदा होतो. राज्यसरकारने यावर्षी १५ नोव्हेंबरला राज्यतील सर्व कारखान्यांना गाळप करण्यास परवानगी दिल्यामुळे जवळपास १५ दिवस आपला कारखाना उशिरा चालु झाला. असे असतांना देखील आपण आपल्या कारखान्याकडे नोंदवलेल्या संपुर्ण ऊस २० मार्च ते २५ मार्च तारखेपर्यंत संपवणार असून आपल्याकडे नोंदवलेल्या संपुर्ण ऊसाचे गाळप करण्यास संचालक मंडळ कटिबध्द असून सभासद शेतकऱ्यांनी बाहेरील कारखान्यास ऊस घालू नये. असे आवाहन श्री. सोमेश्वर सह. साखर कारखान्याचे चेअरमन श्री. पुरुषोत्तम जगताप यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले.

श्री. जगताप पुढे म्हणाले की, सोमेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये सुदैवाने इतर कारखान्याच्या तुलनेने समाधानकारक ऊस आहे. तसेच बाजूच्या अनेक कारखान्याने गाळप क्षमता वाढविल्यामुळे व त्याचे कार्यक्षेत्र पर्यायाने श्री. सोमेश्वरपेक्षा कमी असल्याने त्यांना ऊसाची कमतरता भासत आहे. व अनेक कारखाने आता कार्यक्षमतेपेक्षा कमी चालत आहेत. किंवा बंदही होत आहेत. अशी परस्थिती आसपासच्या कारखान्यांची असल्याने आपल्या कार्यक्षत्रामधील कुठलीही तारीख न पाहता या कारखान्यांनी लवकर ऊस नेण्याचे प्रलोभन दाखवून अनेक सभासदांना ऊस बाहेर घालण्यास बळी पाडले आहे. तरी अशा तातपुरत्या प्रलोभनाला बळी न पडता आपले आर्थिक नुकसान करून कारखान्याकडे नोंदलेला ऊस बाहेर देऊन कारखान्याबरोबर केलेल्या ऊस नोंद कराराचा भंग करून ऊस इतर कारखान्यांना देण्याची चूक करू नये. ही विनंती.

श्री. जगताप पुढे म्हणाले की, कार्यक्षेत्रामध्ये वाढत्या ऊस क्षेत्राचा विचार करून आपण कारखान्याची गाळप क्षमता प्रतीदिन ७५०० मे. टनची केलेली आहे. कारखाना आज जवळपास ९७०० ते ९८०० मे.टन प्रतीदिन क्षमतेने गाळप करत आहे. कारखान्याने पुर्व हंगामी, सुरू व खोडवा या ऊसास अनुदान देखील दिलेले असताना बाहेरील ऊस कारखान्यांना ऊस घालून
संचालक मंडळास नाईलाजास्तव बाहेर ऊस घालणाऱ्या सभासदांवर कारवाई करण्याची वेळ आणू नये ही नम्र विनंती. संपूर्ण गाळप वेळेत पुर्ण होत असताना नोंदीचा संपुर्ण ऊस आपल्या कारखान्यालाच देऊन सहकार्य करावे जेणेकरून जेवढे जास्त गाळप तेवढा उत्पादन खर्च कमी व यामुळे आपल्याला सभासदांना जास्तीचा मोबदला देणे शक्य होईल. तरी या निवेदनाद्वारे सभासदांना कळकळीची व नम्रतेची विनंती की आपण आपला ऊस आपल्याच कारखान्याला देऊन सहकार्य करावे.

चौकट : 
कारखान्याने जास्त गाळप केल्याने जास्त साखर उत्पादन, जास्त वीज निर्मिती व विक्री, अधिकचे अल्कोहोल उत्पादन यामुळे आपणास उच्चाकी दर देण्याची परंपराही राखता येईल.

चौकट : 
संचालक मंडळाने कारखान्याकडे नोंदविलेला ऊस बाहेर घालणाऱ्यावर सर्व सवलती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ऊस तोडीसाठी शेतकऱ्याकडून पैसे घेतल्यास ऊसतोडणी कामगाराच्या बिलातून ते पैसे वसूल केले जातील. त्यामुळे ऊस तोडीसाठी कोणीही पैसे देऊ नयेत. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांची सहमती नसताना जळीत केल्यास कारखान्याकडे लेखी तक्रार करावी. बिगर सहमती शिवाय सभासदांचा ऊस जळीत केल्यास व तसे आढल्यास ऊसतोडणी वाहतूक यंत्रणेच्या ऊसवाहतूक बिलातून सदरील जळीताची रक्कम वसूल करून सबंधीतास अदा केली जाईल.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test