सोमेश्वरनगर -बारामती तालुक्यातील विद्या प्रतिष्ठानचे सोमेश्वर इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्युनिअर कॉलेज सी.बी.एस.ई येथील प्राथमिक व माध्यमिक विभागासाठाची वार्षिक क्रीडा मिळावा अत्यंत उत्साहपूर्व वातावरणात पार पडला.
दिनांक ११ जानेवारी २०२५ व १३ जानेवारी २०२५ रोजी या क्रीडा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. दोन दिवस चाललेल्या या मेळाव्यात शनिवार दिनांक ११ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ज्योत प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी शाळेतील विविध व क्रीडा प्रकारात भरीव कामगिरी करणाऱ्या समृद्धी सावंत ,अनुष्का भुजबळ व शंभू सकुंडे यांच्या हस्ते मैदानाची पूजा करून क्रीडा स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला.
याप्रसंगी सर्व विद्यार्थ्यांनी खेळाडू वृत्तीने स्पर्धा पार पाडण्याची शपथ घेतली .प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी विविध वैयक्तिक तसेच सांघिक खेळात उत्साहाने सहभाग नोंदवला.
सोमवार दिनांक १३ जानेवारी २०२५ रोजी माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी क्रीडा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले वैयक्तिक १०० मीटर ,२०० तसेच ६×१०० रीले अशा धावण्याचा तर न्यू डॉच बॉल, थ्रो बॉल इत्यादी सांघिक खेळही घेण्यात आले.
या क्रीडा स्पर्धेचे नियोजन व सुरळीत संचलन शाळेतील क्रीडा शिक्षक उर्मिला मचाले व रणजित देशमुख यांनी केले. या संपूर्ण स्पर्धेसाठी शाळेचे मुख्याध्यापक सचिन पाठक यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले.यावेळी शाळेतील सर्व प्राथमिक व माध्यमिक विभागातील विद्यार्थी व शिक्षकांनी उपस्थिती दर्शवली.