Type Here to Get Search Results !

...उचली संबंधी सर्व सभासदांची दिशाभुल...शेतकरी कृती समितीची निंबुत येथे आक्रोश सभा घेणार- सतिश काकडे

...उचली संबंधी सर्व सभासदांची दिशाभुल...शेतकरी कृती समितीची निंबुत येथे आक्रोश सभा घेणार- सतिश काकडे 
सोमेश्वरनगर - सोमेश्वरचे चेअरमन पहिल्या उचली संबंधी सर्व सभासदांची दिशाभुल करीत आहेत,शेतकरी कृती समितीची शनिवार दि. ११/१/२०२५ रोजी सकाळी १० वा निंबुत ( ता बारामती) येथे आकोश सभा काल वर्तमान पत्रामधुन चेअरमन यांनी सोमेश्वरची पहिली उचल २८००/- रूपये प्रमे.टन जाहीर केली व उर्वरीत ३२० ते ३५० रू कारखाना बंद होताच देणार तसेच उशीरा गाळप झालेल्या उसास अनुदान देखील देणार असल्याचे जाहीर केले. वास्तविक कृती समितीच्या वतीने चेअरमन यांनी दिलेली बातमी पुर्ण दिशाभुल करणारी आहे चेअरमन व कार्यकारी संचालक यांनी सभासदांच्या तोंडाला पाने पुसली आहेत.
कृती समितीचे ७ ते ८ जणांचे शिष्टमंडळ रविवार दि. ५/१/२०२५ रोजी मा.ना. अजितदादा पवार यांना पहिली उचल, कायद्याप्रमाणे दिड महिन्याचे व्याज मिळणे बाबत, आडसाली उसाचे गाळप पुर्ण होईपर्यंत गेटकेन उस तात्काळ बंद करणे व ज्या सभासदांच्या उसाचे गाळप झाले आहे व ज्या शेतकऱ्यांच्या सोसायटया (पिक कर्ज) बाकी आहे त्या सभासदांचे उसबील कर्जमाफी होणार असल्याने कारखान्यावर अनामत म्हणुन ठेवण्यात याव्यात या मागण्याचे निवेदन देवुन भेटलो असता या चर्चे व काही दरम्यान सोमेश्वर, माळेगाव व छत्रपती या तीन्ही कारखान्याचे चेअरमन काही संचालक सदर मिटींगला उपस्थित होते. पहिल्या उचली बाबत चर्चा होत असताना मा. ना अजितदादा यांनी तिन्ही कारखान्याचे चिफ अकौंटंट व कार्यकारी संचालक यांना कारखान्याचे सर्व कागदपत्रे घेवुन मंगळवार दि. ७/१/२०२५ रोजी दु. ३ ते ३.३० वा मुंबई येथील राष्ट्रवादी भवन कार्यालयात येण्याचे सांगीतले होते व या दरम्यान कृती समितीलाही बोलवण्यात आले होते. त्यावेळी आम्ही दादांना भेटलो असता सोमेश्वर कारखान्याच्या कागदपत्राच्या आधारे सोमेश्वरची पहिली उचल २८००/- रू देण्यास सांगीतले आहे असे आम्हास सांगीतले तसेच रविवारी जे निवेदन शेतकरी कृती समितीने दिले आहे त्यावर सगळी परिस्थिती पाहुन सर्व मागण्यांचा सकारात्मक विचार करून शक्य तेवढी मदत शेतकऱ्यांना करणे बाबत आश्वासन दिले आहे. सोमेश्वरच्या सर्व सभासदांना शेतकरी कृती समिती सांगु इच्छिते हा जो काही प्रकार कृती समीती समोर झाला आहे. त्यावरून चेअरमन कार्यकारी संचालक यांचे काहीतरी फार मोठे गौडबंगाल सुरू आहे. कारण पहिल्या उचली बाबत संचालक मंडळाची मिटींग झाली होती त्यामध्ये पहिली उचल ३०००/- ते ३१००/- रू आपण देवु शकतो अशी चर्चा झाली होती. तसेच गेल्या १० वर्षाचा इतिहास आपण पाहिल्यास महाराष्ट्रात सोमेश्वरने उच्चांकी दर दिला आहे. कोल्हापुर जिल्हयातील काल्लापाण्णा आवाडे कारखाना ३१५०/- रू तसेच वारणा सहकारी साखर कारखाना ३२२०/- तसेच सोमेश्वर शेजारील हुश्री कासारी कारखाना ३३० रू. कायम अडचणीत असलेला दत्त इंडीया कारखाना साखरवाडी यांनी ३१००/- रू पहिली उचल दिली आहे.कुंभी कासारी कारखाना यांनी ३,३०० रुपये मग सोमेश्वर कारखान्याने पहिली उचल २८००/- रूपये देणे कितपत योग्य वाटत आहे याचा विचार सर्व सभासदांनी करावा. ज्याअर्थी कागदपत्रांच्या आधारे दादांनी सोमेश्वरची पहिली उचल २८००/- रू देण्यास सांगीतले त्या अर्थी कारखान्यामध्ये काहीतरी गौडबंगाल निश्चित असल्याचे दिसते. 
वरील सर्व बाबींवर चर्चा करण्यासाठी वरील विषयावर आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी व पुढील दिशा ठरविण्यासाठी सर्व सभासदांना शेतकरी कृती समितीच्या वतीने अवाहन करण्यात येत आहे की शनिवार दि. ११/१/२०२५ रोजी साहेबरावदादा सोसायटी बाबा कमल सभागृह निंबुत येथे सकाळी १०.०० वा मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. सभासदांनी प्रतिसाद न दिल्यास कृती समितीही आग्रेसर राहणार नाही घरी बसुन पैसे मिळणार नाहीत याची सर्व सभासदांनी नोंद घ्यावी. तरी सर्व सभासदांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे ही विनंती सतिशराव शिवाजीराव काकडे अध्यक्ष शेतकरी कृती समिती पुणे जिल्हा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test