स्तुत्य उपक्रम...या संकल्पनेने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत नक्कीच वाढ होणार.
रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी, चिंचवड आणि जगदाळे कोचिंग क्लासेस, वाल्हेकरवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता १० वी मराठी मिडीयमच्या एकूण ८८ विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेसाठी अति महत्त्वाच्या प्रश्नाच्या नोट्स चे वाटप करण्यात आले. या नोट्समध्ये गुणांनुसार प्रश्नांचे विभाजन केलेले असून सर्व विषयाच्या नोट्स एकाच बुक मध्ये देण्यात आलेले आहेत या नोट्समुळे विद्यार्थ्यांच्या किमान ३० ते ४० टक्के गुणांमध्ये वाढ होऊ शकते असे रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी चे अध्यक्ष गोविंद जगदाळे सर यांनी माहिती दिली
करमाळा तालुक्यातील संजय मामा माध्यमिक विद्यालय भोगेवाडी, शारदाताई पवार विद्यालय केम आणि अजित दादा पवार विद्यालय वडशिवणे या शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत देण्यात आल्या. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढ व्हावी आणि त्यांनाही उच्च शिक्षणाची संधी मिळावी ही या मागची तळमळ रोटरी सदस्यांनी व्यक्त केली. सर्व शिक्षक बंधूंनीही या नोट्सची पाहणी केली आणि त्याबद्दल समाधान व्यक्त केले. या नोट्समुळे सर्वच विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल असे मत शारदाताई विद्यालय केम येथील हिंदी विषयाचे शिक्षक प्रकाश जाधव सर , तसेच या शाळेतील गणित शिकवणारे शिक्षक माने सर आणि वडशिवणे येथील इयत्ता दहावीचे वर्गशिक्षक कोरे सर यांनी त्यांचे मत व्यक्त केले.
सदर उपक्रमासाठी आबा जाधव, सुधीर मरळ, सुभाष वाल्हेकर, गणेश बोरा, सचिन खोले, प्रदिप वाल्हेकर, विजयादेवी जगदाळे आणि गोविंद जगदाळे यांनी सर्वतोपरी सहकार्य केले.