बारामती: बारामती येथील शासकीय महिला रुग्णालय चालू होऊन बरेच दिवस झालेले आहे व ते रुग्णालय महिलांसाठी वरदान ठरले आहे. सावित्रीबाई फुले यांच्या 194 व्या जयंतीचे औचित्य साधून बारामती महिला रुग्णालयास सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल कांबळे,अनिकेत मोहिते, मन्सूर शेख,निलेश जाधव यांच्या वतीने बारामती तहसीलदार गणेश शिंदे यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन केली आहे.
महिला शासकीय ग्रामिण रुग्णालय बारामती ऐवजी सावित्रीबाई फुले महिला शासकीय ग्रामिण रुग्णालय बारामती असे नामकरण करण्याची मागणी सदर निवेदनात केली आहे.