भारतीय पत्रकार संघ बारामती वतीने पत्रकार दीन मोठ्या उत्साहात साजरा.
सोमेश्वरनगर - महाराष्ट्र शासनाने पत्रकार दिन हा ६ जानेवारी रोजी बाळशास्त्री जांभेकर. यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत महाराष्ट्र राज्यात हा दिवस साजरा केला जातो. बाळशास्त्री जांभेकर हे मराठी भाषेतील आद्य पत्रकार आहे. यांनी मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पण ६ जानेवारी १८३२ रोजी सुरू केले होते. अवघ्या महाराष्ट्रात सहा जानेवारी हा दिवस पत्रकार दिन म्हणून सर्वत्र मोठ्या उत्साह साजरा केला जातो या अनुषंगाने भारतीय पत्रकार संघ बारामती तालुका वतीने सोमेश्वरनगर येथील संपर्क कार्यालयात आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत पत्रकार दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी पत्रकार संघातील पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.