निधन वार्ता ! काष्टी येथील विठ्ठलराव जठार यांचे वयाच्या ७६ वर्षी निधन.
श्रीगोंदा - श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील विठ्ठलराव शंकर जठार वय वर्ष ७६ यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.काष्टी येथील सहकार महर्षी काष्टी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मध्ये ३० वर्ष सेवा केली होती. त्यांच्या पाठीमागे पत्नी,मुलगा मुलगी,सुना नातवंडे असा परिवार आहे.जठार हे डॅडी नावाने काष्टी गावात प्रसिध्द होते त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
पशुसेवा प्राणीमित्र डॉ.संतोष जठार यांचे ते वडिल होत.