"शब्दगंध" साहित्यिक परिषद बारामती तालुका अध्यक्षपदी प्रा. हनुमंत विठ्ठलराव माने यांची निवड
सोमेश्वरनगर - "शब्दगंध" साहित्यिक परिषद अहिल्यानगर, महाराष्ट्र राज्य या साहित्यिक परिषदेची बैठक राजेंद्र उदागे यांच्या अध्यक्षतेखाली कोहिनूर मंगल कार्यालय अहिल्यानगर या ठिकाणी संपन्न झाली.
साहित्यप्रेमी मंडळ सोमेश्वरनगर या साहित्य संस्थेचे संस्थापक अध्यक्ष- प्रा.हनुमंत विठ्ठलराव माने यांची "शब्दगंध" साहित्यिक परिषदेच्या बारामती तालुका अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
तसेच कोल्हापूर जिल्हा समन्वयकपदी- डॉ. सुनीलकुमार सरनाईक व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई व "शब्दगंध" साहित्यिक परिषद, महाराष्ट्र राज्य आयोजित सोळाव्या राज्यस्तरीय "शब्दगंध" साहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ लेखिका संजीवनी तडेगावकर यांची निवड करण्यात आली आहे.
अशी माहिती "शब्दगंध" साहित्यिक परिषदेचे संस्थापक सचिव सुनील गोसावी यांनी दिली. या निवडीबद्दल
शब्दगंध चे अध्यक्ष- राजेंद्र उदागे, कार्याध्यक्ष- ज्ञानदेव पांडुळे, कार्यवाह- भारत गाडेकर, राज्य संघटक- प्रा. डॉ.अशोक कानडे,उपाध्यक्ष- प्राचार्य डॉ. जी.पी. ढाकणे, संस्थापक सचिव-सुनील गोसावी, खजिनदार- भगवान राऊत, संयोजन समिती प्रमुख बबनराव गिरी यांनी अभिनंदन केले.
साहित्यप्रेमी मंडळ सोमेश्वरनगर (ता बारामती)या साहित्य संस्थेच्या वतीने आजवर २१ प्रातिनिधिक कविता संग्रहाचे संपादन करण्यात आले असून नवोदित कवींचे कवी संमेलन, चर्चासत्र, संभाषण कला व भाषण कला कार्यशाळा, व्याख्यानमाला ,पुस्तक प्रकाशन सोहळा, राज्यस्तरीय साहित्यरत्न व जीवनसाधना पुरस्कार वितरण समारंभ इ. साहित्यिक उपक्रम गेली सतरा वर्ष अविरतपणे चालविलेले आहेत.
आजवर प्रा. हनुमंत माने यांना महाराष्ट्रातील विविध नामांकित संस्थांच्या वतीने ११ राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
संपूर्ण महाराष्ट्र व कर्नाटक, राजस्थान, गोवा या चार राज्यात साहित्यप्रेमी मंडळाचे चार हजार पेक्षा अधिक सभासद असलेला साहित्यिक परिवार साहित्यप्रेमी संस्थेला जोडलेला आहे.