Type Here to Get Search Results !

आमच्याच गावात हॉटेल चालून आम्हालाच नडतो काय ...आत्ता आम्हाला नड असे म्हणत त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला..माळेगाव पोलिसांनी त्या हल्लेखोरांना पाठलाग करत हडपसर गाडीतळ परिसरातून घेतले ताब्यात.

आमच्याच गावात हॉटेल चालून आम्हालाच नडतो काय ...आत्ता आम्हाला नड असे म्हणत त्यांच्यावर धारदार शस्त्राने  हल्ला..माळेगाव  पोलिसांनी त्या हल्लेखोरांना पाठलाग करत  हडपसर गाडीतळ परिसरातून घेतले ताब्यात.
             
बारामती - माळेगाव पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील मौजे क-हावागज ता. बारामती या गावचे हद्दीतील हॉटेल शारदा एक्झिक्युटिव्ह बार, रेस्टॉरंट अँड लॉजींग ही आस्थापना काल दिनांक १३ जानेवारी रोजी रात्रौ 10.00 वा. बंद करून त्याचे मॅनेजर तसेच इतर सर्व कामगार हे काम आवरून रात्रौ 11.00 वा. चे सुमारास झोपण्यासाठी गेले असता आज दिनांक 14/01/2025 रोजी मध्य रात्रौ 01.45 वा.चे सुमारास 1) विशाल बाबा मोरे 2) संदेश उर्फ आबा अनिल शिंदे दोघेही रा. कऱ्हावागज ता.बारामती 3) निखिल अशोक खरात रा.आमराई बारामती ता.बारामती जि.पुणे यांनी यातील तक्रारदार व हॉटेल मॅनेजर श्री ऋषिकेश भाऊसाहेब मिंड मूळ रा.कडा ता.आष्टी जि.बीड सध्या रा.हॉटेल शारदा बार अँड लॉजिंग कऱ्हावागज ता.बारामती जि.पुणे हे हॉटेल शारदा मध्ये झोपलेल्या रूममध्ये घुसून शिवीगाळ करीत मला दारू देत नाहीस का आमच्याच गावात हॉटेल चालून आम्हालाच नडतो काय आता तुला सोडत नाही आता आम्हाला नड असे बोलून मारहाण करून फिर्यादीस खाली पाडले तसेच त्यानंतर निखिल खरात याने त्याच्या जवळील असलेले धारदार चाकूने फिर्यादीवरून हल्ला केला असता फिर्यादी पटकन मागे सरकले मुळे तो वार फिर्यादीच्या पायावर लागला त्यामुळे हॉटेलमधील कामगार फिर्यादीस वाचविणे करिता मध्ये आलेने हल्लेखोर निखिल खरात याने दिनेश वर्मा मूळ रा.उत्तर प्रदेश याचे पोटात धारदार चाकू खुपसून तसेच इतर कामगारांवर देखील चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर वरील नमूद इसम हे त्यांचे ताब्यातील चार चाकी वाहनातून पळून गेले. 
        सदरच्या घटनेबाबत माळेगाव पोलीस स्टेशनला माहिती प्राप्त झालेनंतर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून माळेगाव पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी स.पो. सचिन लोखंडे यांनी माळेगाव ठाणे कडील गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक  देवीदास साळवे यांचे पथक हल्लेखोरांना ताब्यात घेण्यासाठी मार्गदर्शक सूचना देऊन तात्काळ रवाना केले, त्यानंतर 1) विशाल बाबा मोरे 2) संदेश उर्फ आबा अनिल शिंदे दोघेही रा. कऱ्हावागज ता.बारामती 3) निखिल अशोक खरात रा.आमराई बारामती ता.बारामती जि.पुणे असे फरार होण्याचे उद्देशाने पळून जात असताना त्यांना पोलीस उपनिरीक्षक देविदास साळवे यांचे पथकाने घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तसेच तांत्रिक विश्लेषण आधारे हल्लेखोरांना पाठलाग करून आज दिनांक 14/01/2024 रोजी पहाटे हडपसर गाडीतळ परिसरातून ताब्यात घेतलेले आहे.
          तसेच सदर घटनेच्या अनुषंगाने हॉटेल मॅनेजर ऋषिकेश भाऊसाहेब मिंड यांच्या फिर्यादी जबाब वरून माळेगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 10/2025 भारतीय नागरिक संहिता कलम 109,118(1), 118(2),333,115 (2),352, 3 (5) सह शस्त्र अधिनियम कलम 4/25 याप्रमाणे गुन्हा दाखल झालेनंतर वरील नमूद तिन्ही हल्लेखोर यांना सदर गुन्ह्याचे कामी अटक करण्यात आलेली आहे
    सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक  देविदास साळवे हे करीत आहेत. 
        सदरची कामगिरी  पंकज देशमुख सो. पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण,  गणेश बिरादार सो, अपर पोलीस अधीक्षक बारामती विभाग,डॉ सुदर्शन राठोड सो. उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती उपविभाग,.अविनाश शिळीमकर सो. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, पुणे ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली माळेगाव पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी स.पो.नि.सचिन लोखंडे, पोलीस उपनिरीक्षक .अमोल खटावकर, .देविदास साळवे, पोलीस अंमलदार राहुल पांढरे,.विजय वाघमोडे,ज्ञानेश्वर मोरे, नंदकुमार गव्हाणे,  अमोल राऊत,  सागर पवार, जयसिंग कचरे, अमोल कोकरे यांनी केलेली आहे.


Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test