फोटो ओळ - शालेय साहित्य वाटप करताना मान्यवर ग्रामस्थ.
सोमेश्वरनगर - दरवर्षी ३ जानेवारीला देशभरात सावित्रीबाई फुले जयंती साजरी केली जाते. एक थोर समाजसेविका, उत्तम कवयित्रि आणि तत्त्वज्ञ म्हणून त्यांची समाजात ओळख आहे. सावित्रीबाई फुले या देशाच्या पहिल्या शिक्षिका मानल्या जातात. त्यांचा विवाह महात्मा ज्योतिबा फुले सोबत झाला तसेच देशातील पहिली महिला शाळा उघडली अशी विद्यार्थ्यांना माहिती देत सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला हार पुष्पगुच्छ अर्पण करत सावित्रीमाई ज्योतिराव फुले यांची जयंती साजरी करण्यात आली तसेच एक सामाजिक उपक्रम म्हणून बारामती तालुक्यातील करंजे येथील जि.प.प्राथमिक व अंगणवाडी शाळा जोशीवाडी,माळेवाडी व देऊळवाडी येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप करत साजरी करण्यात आली. यावेळी करंजे, रासकरमळा, जोशीवाडी ,माळवाडी येथील पदाधिकारी, मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच या उपक्रमाबद्दल जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडी येथील शिक्षक शिक्षिका यांनी त्यांचे कौतुक करत आभार मानले.