सोमेश्वरनगर - नवनाथ उद्योग समूहाचे अध्यक्ष व श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक श्री. संग्रामभाऊ सोरटे यांचे नेतृत्वाखाली बारामती तालुक्यातील मगरवाडी ग्रामपंचायत उपसरपंच पदाची एकमताने बिनविरोध निवडणूक पार पडली. विद्यमान सरपंच विनिता हगवणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या निवडणुकीमध्ये वैशाली गायकवाड यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने त्यांची सर्वानुमते उपसरपंच पदी बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायतचे सर्व सदस्य उपस्थित होते .मागील उपसरपंच शैला नाईक यांनी पदाचा राजीनामा दिल्यामुळे ही निवडणूक घेण्यात आली. यावेळी मगरवाडी गावचे माजी सरपंच अजित सोरटे, रामभाऊ शेलार, अलका येळे, रामभाऊ गोळे , गणेश शेलार, दिलीप मगर, तात्यासो गायकवाड व इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते उपसरपंच निवडीचे सर्व कामकाज ग्रामसेवक सोनाली जाधव यांनी पाहिले.
मगरवाडी ग्रामपंचायत उपसरपंच पदी वैशाली गायकवाड यांची बिनविरोध निवड.
January 18, 2025
0
मगरवाडी ग्रामपंचायत उपसरपंच पदी वैशाली गायकवाड यांची बिनविरोध निवड.
Tags