बारामती - गेली अकरा वर्षे साई भक्त परिवार गोवा ही संस्था गोवा ते शिर्डी पदयात्रा आयोजित करते या वर्षी ६ जानेवारी ते २३ जानेवारी २०२५ या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. या रथयात्रेचा मुक्काम निर्गुण पादुका मंदीर मळद बारामती येथे दरवर्षी असतो. यावर्षी देखील १५ रोजी रात्री ७ वाजता या पदयात्रेचे आगमन निर्गुण पादुका मंदीर मळद येथे झाले. आरती झाल्यानंतर महाप्रसादाची व निवासाची व्यवस्था निर्गुण पादुका मंदीर तर्फे करण्यात आली.
या रथयात्रेत चालणा-या शंभर भक्तांना गिरणारी चॅरिर्टेबल व मेडीकल ट्रस्ट या संस्थेतर्फे वैदयकीय सेवा देण्यात आली गेली ४ वर्षे या पदयात्रेला गिरणारी चॅरीर्टेबल व मेडीकल ट्रस्ट सेवा देते. वैदयकीय सेवा देण्यासाठी डॉ. प्रशांत जावळे, परागशेठ गुजर, रोहीत खोमणे बालाजी डिस्ट्रीब्युटर्स, हिम्मत पडळकर, एकनाथ देवकाते, विवेक देशमुख, यांचे सहकार्य लाभले.
गिरणारी चॅरिर्टेबल व मेडीकल ट्रस्ट वर्षभर वैदयकीय सेवेचे उपक्रम चालवते. दरवर्षी ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळयासाठी बाळुपाटलाचीवाडी लोणंद येथे सेवा देते.तसेच गिरणारी दत्तात्रय प्रगट देवस्थान वलझडवाडी खंडाळा येथे वर्षभर वैदयकीय सेवा देते असल्याने त्यांचे परिसरात अभार व भक्ताकडून कौतुक होत आहे.