Type Here to Get Search Results !

..तु का अभ्यास करत नाही याचा राग आल्याने वडिलांनी स्वतःच्या नऊ वर्षांच्या मुलाचा भिंतीवर आपटून, त्याचा गळा आवळून जीव घेतला.

..तु का अभ्यास करत नाही याचा राग आल्याने वडिलांनी स्वतःच्या नऊ वर्षांच्या मुलाचा भिंतीवर आपटून, त्याचा गळा आवळून  जीव घेतला.
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील होळ येथील घटना मिळालेल्या माहितीनुसार तू का अभ्यास करत नाही याचा राग आल्याने वडिलांनी स्वतःच्या नऊ वर्षांच्या मुलाचा गळा दाबून खून केल्याची घटना घडली आहे यामधील आरोपी वडील विजय गणेश भंडलकर यांनी स्वतःच्या मुलाला भिंतीवर आपटून, त्याचा गळा आवळून त्याचा जीव घेतल्याचे उघड झाले आहे.
पोलिसांनी विजय गणेश भंडलकर, शालन विजय भंडलकर, आणि संतोष सोमनाथ भंडलकर (सर्व रा. होळ, ता. बारामती, जि. पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
१४ जानेवारी रोजी दुपारी अडीचच्या सुमारास नववर्षाचा पियुष घरात असताना तू सारखा बाहेर खेळतोस, तुझी आईसारखा वागत माजी नाव घालवतोस, असे म्हणत पिऊ च्या वडिलांनी रागाच्या भारत त्याचे भिंतीवर आपटले. त्यानंतर गळा दाबून त्याचा खून केला.घटनेच्या वेळी आई शालन भंडलकर हजर होती. परंतु, तिने पतीला थांबवण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही या उलट तिने विजय भंडलकर यांच्या सांगण्यानुसार पियुष हा चक्कर येऊन पडल्याचे खोटे कारण सांगितले.संतोष भंडलकर यांनी मुलाला खाजगी रुग्णालयात नेले असता मुलाचा मृत्यू चक्कर येऊन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले त्यानंतर पियुषला प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यास सांगितले. मात्र, त्या तिघांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात न जाता पियुषचे मृतदेह व त्या मृत्यूविषयी कोणालाही कळू नये म्हणून गावातील पोलीस पाटील किंवा इतरांना माहिती न देता थेट अंत्यविधीची तयारी करण्यात आली परंतु घडलेल्य गुन्ह्याची माहिती पोलिसांना मिळताच विजय भंडलकर व त्यांच्या कुटुंबीयांविरोधात खुनाचा आणि पुरावे नष्ट करण्याचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास वडगाव निंबाळकर चे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली करंजेपुल दूरक्षेत्रचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे करत आहेत.
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test