नीरा - पुरंदर तालुक्यातील निरा येथील महात्मा गांधी विद्यालयात राज्य क्रीडा दिन उत्साहात पार पडला आज ऑलम्पिकवीर महान कुस्तीपटू खाशाबा दादासाहेब जाधव यांचा जन्मदिन महाराष्ट्र शासनातर्फे राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येतो या दिनाचे औचित्य साधून विद्यालयात ऑलिंपिक वीर खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे प्राचार्य अर्जुन कोकरे, पर्यवेक्षक संजय पवार व सर्व शिक्षक बंधू भगिनी यांनी केले व विद्यालयातील कुस्तीपटूंचे याप्रसंगी पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
विद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमुख विनय तांबे ऑलिंपिक वीर खाशाबा जाधव यांच्या विषयी माहिती सांगितली त्यांनी घेतलेले परिश्रम व लहानपणापासूनची चिकाटी याच्या जोरावरती ते ऑलम्पिक वीर झाले. ऑलिंपिक स्पर्धेत खाशाबा जाधव यांचे प्राचार्य बॅरिस्टर खर्डेकर यांनी खाशाबा जाधव यांना स्वतःचे घर गहाण ठेवून मदत केली होती असे त्यांच्या मनोगतामध्ये सांगितले.
क्रीडादिनानिमित्त विद्यालयामध्ये कबड्डी व धावण्याच्या स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेचे उदघाट्न विद्यालयातील कुस्तीपटू आर्यन शिंदे यश भोसले, ओम जगदाळे, सोहम लकडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून झाले.विद्यालयाचे उपशिक्षक संजय माळी यांनी आभार मानले.