सोमेश्वर येथे स्वामी विवेकानंद जयंती व राष्ट्रीय युवा दिनानिमित्त विवेकानंद करियर अकॅडमी 'सोमेश्वर मॅरेथॉन' स्पर्धा संपन्न.
विविध जिल्ह्यांमधून ३३५ धावपटूंनी घेतला होता भाग
सोमेश्वरनगर - स्वामी विवेकानंद जयंती व राष्ट्रीय युवा दिनानिमित्त विवेकानंद करियर अकॅडमी आयोजित सोमेश्वर मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन बारामतीतील सोमेश्वरनगर येथे रविवार दि १२ जानेवारी रोजी करण्यात आले होते ,हि स्पर्धा करंजेपूल मुख्य चौक ते सोमेश्वर मंदिर रोड या ठिकाणी पार पडली. मॅरेथॉन स्पर्धा ऐकून चार गटात पार पडली खुला वयोगट मुले पाच कि.मी व तीन कि.मी मुली तसेच सोळा वर्षाखालील वयोगट तीन कि.मी मुले व दोन कि.मी मुली अश्या वयोगटामध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विजेत्या स्पर्धकांना तब्बल पन्नास हजार रुपयांची रोख पारितोषिके तसेच मेडल्स,ट्रॉफी प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आले स्पर्धेमध्ये धावले ३३५ स्पर्धकांनी भाग घेतला होता
तसेच आजी माजी सैनिक संघटना व सोमेश्वर स्पोर्ट्स अकॅडमी बारामती यांच्या योगदानातून सोळा वर्षाखालील वयोगटातील स्पर्धकांना बक्षिसे देण्यात आली.स्पर्धेसाठी खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी बारामतीतील करंजेपूल येथील रहिवासी असणारे व सध्या लातूर जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून कार्यरत असणारे जगन्नाथ लकडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
या कार्यक्रम प्रसंगी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ चे माजी विभाग नियंत्रक पुणे रमाकांतजी गायकवाड, ,आजी-माजी सैनिक संघ बारामती अध्यक्ष बाळासाहेब शेंडकर , उपाध्यक्ष भगवान माळशिकारे सह संघटनेतील पदाधिकारी उपस्थित होते ॲड गणेश आळंदीकर, वाघळवाडी ग्रामपंचायत सदस्य तुषार सकुंडे, युवा नेते दिग्विजय मगर, युवा उद्योजक मयूर शेंडकर, युवती अध्यक्षा, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महिला युवती बारामती तालुकाध्यक्ष प्रियंका राहुल शेंडकर , मैदानी प्रशिक्षक अंकुश दोडमिसे , नवी मुंबई पोलीस चेतन कोळपे, पोलीस उपनिरीक्षक सांगली सागर होळकर, भारतीय पत्रकार संघ तालुकाध्यक्ष विनोद गोलांडे,सामजिक कार्यकर्ते राजू बडदे , संचालक चंद्र्स्मुर्ती अभ्यासिका मुर्टी नितीन ननावरे , उद्योजक देवा ग्रुप सागर गायकवाड , करंजेतील युवा उद्योजक शेखर भगत , प्रा दत्तात्रय जगताप, बाळासाहेब सूर्यवंशी या मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना बक्षिसे देण्यात आले. तसेच वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन अंतर्गत करंजेपूल दूर शेत्र चे सहायक पोलीस उपनिरीक्षक वारुळे साहेब , देशमाने साहेब , अमोल भोसले यांचे ही मॅरेथॉन स्पर्धेसाठी विशेष सहकार्य लाभले त्याच बरोबर विजय भापकर व अनिकेत लोखंडे यांनी मॅरेथॉन स्पर्धेसाठी रुग्णवाहिका व आरोग्य सेवा पुरवली या सर्वांच्या योगदानातून मॅरेथॉन स्पर्धा यशस्वी ठरली.
खुला गट पाच की मी मुले निकाल प्रथम क्रमांक राहुल चव्हाण सांगली,दुसरा व तिसरा क्रमांक साहिल गायकवाड दहिवडी, ऋतिक उंबरकर मांढदेवी,खुला गट तीन कि मी मुली निकाल अनुष्का शिंदे सातारा, दुसरा व तिसरा क्रमांक रिद्धी सप्रे श्रीगोंदा, रिद्धी हगवणे बारामती,चतुर्थ क्रमांक श्रुती गायकवाड सोमेश्वरनगर पुढील मुले तीन कि.मी सोळा वर्षाखालील निकाल प्रथम क्रमांक अनिश गार्डी बारामती,दुसरा व तिसरा क्रमांक शंतनु नवघणे सातारा, यश गातवे दौंड तसेच सोळा वर्षाखालील निकाल प्रथम क्रमांक वनिता ठोंबरे वडगाव, दुसरा व तिसरा क्रमांक अनुष्का शिंदे सातारा, पार्वती मेसी सातारा यांनी पटकावले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवराज शिंदे यांनी केले आणि कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार विवेकानंद अभ्यासिका चे संचालक गणेश सावंत यांनी मानले.