सुदैवाने शाळेची प्रार्थना सुरू असतानाच.. त्या शाळेतील एका खोलीच्या आतील सिलींगचे प्लॅस्टर अचानक ढासळले... जीवित हनी टळली.. कामाबाबत प्रश्नचिन्ह.? घटने अगोदरच प्रथम लेखी निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशारा दिला होता...निषेधार्थ उपोषण सुरु केले.
यापूर्वी या शाळा दुरुस्ती बाबत व योग्य रितीने उभारणी करणेबाबत तथा विद्यार्थी सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्हाधिकारी सो. सातारा. जिल्हा परिषद मुख्याधिकारी ज्ञानेश्वर खिलारी साहेब व शिक्षणाधिकारी शबनम मुजावर यांकडे समक्ष भेटून लेखी निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशारा दिला होता. सदर अधिकारींचा या विनंतीवर कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही. यातच अशा प्रकारची दुर्घटना घडलेने संतप्त होऊन सदर उपोषणकर्ते यांनी या नव्याने उभारण्यात आलेल्या शाळा खोल्यांची बांधकाम दर्जा तपासणी करण्यात यावी. विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या जिवेतेला धोका निर्माण करणारे संबंधित प्रकल्प अधिकारी व ठेकेदार यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. खोल्यांची उत्कृष्ट पद्धतीने उभारणी पुन्हा करण्यात यावी आदी मागण्यांसाठी पीएमश्री शाळा व्यवस्थापन समिती चेअरमन तथा साथ प्रतिष्ठाण चे अध्यक्ष कय्युम मुल्ला, माहिती अधिकार कायदा जनजागृती अभियान केंद्र खंडाळा तालुका अध्यक्ष यशवंत दणाणे, संभाजी ब्रिगेडचे खंडाळा तालुका कार्याध्यक्ष दिपक बाटे यांनी आमरण उपोषणास सुरुवात केली आहे.