सोमेश्वरनगर प्रतिनिधी :-
शेतकरी कृती समितीचे सोमेश्वर कारखान्यास हंगाम २०२४-२५ च्या खालील मागण्या मान्य करण्यासाठी दि. ५/१/२०२५ पर्यंतचा अल्टिमेटम् मागण्या मान्य न झाल्यास दि. ९/१/२०२५ रोजी काटाबंद आंदोलान करणारच - सतिश काकडे
बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा हंगाम २०२४-२५ सुरू होवुन ४४ दिवस झाले कारखान्याचे गाळप ३ लाख ७५ हजार झाले असुन पोती सुमारे ४ लाखाच्या वर तयार झाली आहेत तरी देखील अद्याप पर्यंत सभासदांना बीलाची रक्कम वर्ग केली नाही. तसेच सभासदांच्या उस तोडीस या वर्षी देखील विलंब होत आहे. अद्याप पर्यंत १/७ च्या व रोपाच्या लागणी गेलेल्या नाहीत. तरी खालील मागण्यांचा विचार करून तात्काळ कार्यवाही करण्यात यावी याबाबत कारखान्यास दि. २८/१२/२०२४ रोजी बहुसंख्य सभासदांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले.
मागण्या :-
१) हंगाम २०२४/२५ ची पहिली उचल एकरक्कमी ३३००/- रू प्र.मे.टन व्याजासह तात्काळ सभासदांच्या बँक खात्यावर वर्ग करावी.
२) कारखान्याने गेटकेन उसाचे गाळप पुर्णपणे बंद करावे व सभासदांच्या उसास प्राधान्य द्यावे. कारण कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांचा उस संपल्याशिवाय गेटकेन उस घ्यायचा नाही असा ठराव झाला असताना गेटकेन उस येतोच कसा? तरी एक आठवड्याच्या आत बाहेरील सर्व टोळ्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात आणण्यात याव्यात. गेटकेन उस कारखान्याची उस तोडणी व वाहतुक यंत्रणा आणत नसेल तरी सुध्दा गेटकेन उस घेवु नये. याचे कारण बाहेरून गेटकेनचा उस आल्याने सभासदांच्या उस तोडी लांबत चालल्या आहेत व वाहनतळावर वाहने खाली होण्यास उशीर होत असल्याने उस वाळत आहे.
३) नवीन मंत्रीमंडळ हे लवकरच शेतकऱ्यांची संपुर्ण कर्जमाफी करणार असल्याने ज्या सभासदांचा उस आलेला आहे परंतु त्यांच्या नावे सोसायटीचे कर्ज आहे त्या सर्व शेतकरी सभासदांचे पैसे कपात न करता कारखान्यावर अनामत म्हणुन जमा ठेवण्यात यावे व शासनाचा अंतिम निर्णय झाल्यावर सभासदांचे लेखी पत्र घेवुन मगच पैसे वर्ग करण्यात यावेत.
वास्तविक कोल्हापुर जिल्ह्यातील बहुतांश कारखान्याची रिकव्हरी सोमेश्वर कारखान्यापेक्षा थोडी जास्त असली तरी त्या कारखान्याचे कशिंग, साखरपोती व अंतिम बिल बऱ्याच वर्षापासुन सोमेश्वर
कारखान्यापेक्षा कमी आहे. उलट सोमेश्वर कारखान्याचे गेल्या काही वर्षांत उच्चांकी कशिंग, चांगला साखर उतारा, उच्चांकी साखरपोती, जादाचे उपपदार्थ उत्पादन व विज निर्मितीमध्ये आग्ग्रेसर असल्याने कारखान्याने मागील काही वर्षापासुन राज्यात उच्चांकी अंतिम दर दिलेला आहे. मग कारखान्याची आर्थिक परिस्थिती चांगली असताना आज जवळपास सभासदांच्या साखर पोत्याचे १२५ कोटी रूपये कारखाना प्रशासन बिनव्याजी वापरत आहे. दुसरीकडे सभासदांना मात्र कर्जावरील व्याज भरावे लागत आहे. त्यामुळे तात्काळ ३३००/- रू प्रमाणे व्याजासह बील सभासदांच्या बँक खात्यावर वर्ग करावे. कारण क्षणा कारखाना ३२००/ रू, सहयाद्री कारखाना ३२००/- रू, रयत अथनी कारखाना ३२००/- रू, जयवंत शुगर कारखाना ३२००/- रू, शिवनेरी कारखाना ३२००/- रू दत्त इंडीया काराखाना साखरवाडी ३१०० प्र. मेटन अशा पहिल्या उचली जाहीर झाल्या आहेत व काही कारखान्यांनी सभासदांच्या खात्यावर पैसे वर्ग देखील केले आहेत. कारखान्याास ३ आठवडयापुर्वी या संबंधी निवेदन दिले होते परंतु संचालक मंडळाने याची कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे आपण सोमेश्वरच्या सभासदांचा अंत न पाहता वरील मागण्यां बाबत अंमलबजवणी तात्काळ करण्यासाठी कारखान्यास दि. ५/१/२०२५ पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली असुन कार्यवाही न झाल्यास नाईलाजास्तव दि. ९/१/२०२५ रोजी काटाबंद आंदोलन करण्यात येईल व याची सर्वस्वी जबाबदारी चेअरमन, संचालक मंडळ व कार्यकारी संचालक यांच्यावर राहील. अशी माहिती यावेळी कृती समितीच्या वतीने देण्यात आली. यावेळी सतिशराव काकडे, शहाजीआबा जगताप, संजय घाडगे, धन्यकुमार जगताप, बाबा शिंदे तानाजीराव जगताप, लक्ष्मण गावडे, धोंडीराम आगवणे, राजकुमार बनसोडे, अमरसिंह चव्हाण, बंटीराजे जगताप, प्रकाश जगताप, संपतराव लकडे, राहुल जगताप, मुकुंदराव काकडे, रविराज जगताप, मारूती काकडे, मोहनराव यादव, दत्तात्रय काकडे, नाना लकडे, हिंदुराव काकडे, पांडुरंग गडदरे, गुलाब हाके, हेमंत काकडे, विशाल गलांडे, छबन गडदरे, गणेश फरांदे, अजित काकडे, मधुकर बनसोडे, योगीराज काकडे, अमोल निगडे, शंकर महानवर, भिमराव बनसोडे, प्रविण कोरडे, मदनराव काकडे, अनंत सकुंडे, रूपेश काकडे, अविनाश जगताप, मोहन जगताप, संभाजी काकडे, संतोष सुर्यवंशी, गणेश यादव, दत्तात्रय भोईटे, अंकुश जगताप व इतर बहुसंख्य सभासद उपस्थित होते.