"युसीसी" संस्थात्मक राष्ट्रीय पाककृती स्पर्धेत पुण्याच्या युईआय ग्लोबल एज्युकेशन चा आयुष बिडवे प्रथम तर "मास्टर शेफ" किताबाचा मानकरी
बारामती प्रतिनिधी:-
"युसीसी" संस्थात्मक राष्ट्रीय पाककृती स्पर्धेत पुण्याच्या युईआय ग्लोबल एज्युकेशन चा आयुष बिडवे प्रथम ५१०००/-₹ बक्षिसासह "मास्टर शेफ" किताबाचा मानकरी आपण जे शिक्षण घेतो ते आपल्या आयुष्यात उपयोगी पडावे म्हणून युईआय ग्लोबल एज्युकेशन ही "हॉस्पिटॅलिटी आणि हॉटेल मॅनेजमेंट" क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेने, देशातील ९ विविध शाखांमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी "युसीसी" राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन केले होते. यावर्षी या स्पर्धेचा सिझन २ नुकताच लखनऊ येथे संपन्न झाला. या स्पर्धेत युईआय ग्लोबलच्या देशभरातील शाखामधून १९० स्पर्धक विध्यार्थी सहभागी झाले होते.
यामध्ये युईआय ग्लोबलच्या पुण्यातील शिवाजीनगर भागात गेली १८ वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या शाखमधून १५ विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभागी होऊन आपल्या कौशल्याची चमक दाखविली. 'युसीसी' म्हणजे "युईआय कलिनरी कॉम्पिटिशन " स्पर्धेत विध्यार्थ्यांच्या कला गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजन केले जाते, या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिगत सहभाग महत्वाचा असतो.
एकूण तीन फेऱ्यात होणाऱ्या या स्पर्धेत पहिल्या दिवशी पहिली फेरी " मिस्ट्री बॉक्स चॅलेंज", दुसऱ्या दिवशी दुसरी फेरी "ड्रेस अ केक " तर तिसऱ्या दिवशी " फ्युजन फेरी " ही तिसरी फेरी संपन्न झाली. या तीन फेऱ्यात सहभागी झालेल्या १९० विद्यार्थ्यामधून सर्वोत्कृष्ठ १७ विध्यार्थी अंतिम फेरीसाठी निवडण्यात आले. या अंतिम फेरीसाठी स्पर्धकांना तीन तासाच्या अवधीत "स्टार्टर","मेन कोर्स"आणि "डेझर्ट "बनवून सादर करायचे होते. या सर्व प्रकारात अव्वल ठरत युईआय ग्लोबल, पुणे येथील आयुष बिडवे याने प्रथम क्रमांकाच्या बक्षीसावर आपले नाव कोरले. यामध्ये ₹. ५१०००/- च्या रोख रकमेसह, प्रथम क्रमांकाची ट्रॉफी, विशेष प्राविण्य प्रमाणपत्र आणि गिप्ट हॅम्पर प्रमुख पाहुण्याच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
दुसऱ्या क्रमांकवरील विजेत्याला ₹. २१०००/- तर तिसऱ्या विजेत्याला ₹. ११०००/- चे रोख बक्षीस देण्यात आले. रेडिओसिटी, मिलेटझकार्ट, मोनिन आणि कॅच स्पाईसेस यांनी
सदर राष्ट्रीय स्पर्धेचे प्रयोजकत्व केले.
या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून आयसीएफ चे उपाध्यक्ष शेफ शिरीष सक्सेना, आयटीसी फॉरचूनचे महाव्यवस्थापक ब्रिजेशकुमार आणि मर्क्युअरचे महाव्यवस्थापक अमित कपूर यांनी काम पहिले. परीक्षक म्हणून काम करताना विध्यार्थी स्पर्धाकांनी बनविलेल्या पाककृतीचे कौतुक करताना या तीनही महिनीय व्यक्तींनी त्यांना आलेले अनुभव विद्यार्थ्यांना सांगितले तसेच त्यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे केले.
विध्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी युईआय ग्लोबल ही संस्था कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन या संस्थेचे सीईओ श्री. मनीष खन्ना यांनी केले. या संस्थेत शिक्षण घेणाऱ्या विध्यार्थ्यांना राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय पदार्थांची, ते बनविण्याच्या आणि सादर करण्याच्या कृतींची माहिती व्हावी म्हणून आम्ही देशभरातील विद्यार्थ्यांना एकत्र आणून अशा स्पर्धेचे आयोजन करीत असल्याचे त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले. आपल्या युईआय ग्लोबल या संस्थेमध्ये देशभरातील नऊ केंद्रांवर सुमारे 22000 विद्यार्थी हॉस्पिटॅलिटी आणि हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रात करिअर घडवत आहेत याचा आम्हांला अभिमान असल्याचे मनिष खन्ना यांनी सांगितले.
"युसीसी "स्पर्धेसाठी जाणाऱ्या विध्यार्थ्यांची तयारी युईआय ग्लोबलच्या पुणे येथील केंद्र संचालिका वैशाली चव्हाण, प्राचार्य वसुधा पारखी, शेफ आनंद आणि शेफ रिझवान यांनी आपली तयारी करून घेतल्यानेच आपण प्रथम पटकवला अशी भावना आयुष बिडवे यांनी व्यक्त केली. युईआय ग्लोबल पुणे येथून शिक्षण - प्रशिक्षण घेऊन जाणारी मुले आता राष्ट्रीय आंतर राष्ट्रीय पातळीवरील पंचतारांकित हॉटेल्समध्ये आपली सेवा देत आहेत आणि आम्हांला त्याचा अभिमान असल्याची प्रतिक्रिया वैशाली चव्हाण यांनी दिली.